मुंबई- ग्लोबल स्टार प्रियांका चोप्रा आणि निक जोनास आपल्या आयुष्यात येणाऱ्या छोट्या छोट्या आनंदाचे क्षण साजरे करताना नेहमी दिसतात. अलीकडेच, दोघांनीही त्यांची सहा महिन्यांची मुलगी मालतीचा वाढदिवस साजरा केला. या सेलेब्रिशनचे फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले. अशा परिस्थितीत आता दोघेही पुन्हा आई-वडील होणार असल्याची चर्चा रंगली आहे. दोघेही दुसऱ्या मुलाची योजना करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मालतीसाठी भाऊ किंवा बहीण असणे आवश्यक असल्याचे दोघांचेही एकमत आहे.
दुस-या अपत्यासाठीही हे जोडपे सरोगसीचा अवलंब करणार असल्याची बातमी आहे. विशेष म्हणजे प्रियांका आणि निकची मुलगी मालती मेरी चोप्रा जोनास देखील सरोगसीद्वारे जन्मली आहे. प्रियांकाने इंस्टाग्राम अकाउंटवर ही खुशखबर दिली आहे. फादर्स डेच्या निमित्ताने प्रियंका चोप्राने तिच्या छोट्या परीचा फोटो शेअर केला आहे. दोघांनी मालतीचा चेहरा अद्याप दाखवलेला नाही. ती प्रियांकाच्या मांडीवर बसलेली दिसत आहे. प्रियांका तिच्या बाळाला आपल्या मिठीत घेऊन आहे आणि दुसरीकडे निक आपल्या मुलीकडे मोठ्या प्रेमाने पाहत आहे.