महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

प्रियांका चोप्रा, निक जोनसनं मधू चोप्रासोबत नवीन वर्ष केलं साजरं - मधु चोप्रा

Priyanka-Nick New year Celebration: अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि निक जोनासचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये हे जोडपे न्यू इयरचा आनंद लुटताना दिसत आहे.

Priyanka-Nick New year Celebration
प्रियांका-निक न्यू इयर सेलिब्रेशन

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 2, 2024, 5:55 PM IST

मुंबई - Priyanka-Nick New year Celebration: प्रत्येकजणांनी नवीन वर्षाचे मोठ्या थाटामाटात स्वागत केले. बॉलीवूड सेलिब्रिटींपासून ते सामान्य लोकांपर्यंत सर्वजणांनी नवीन वर्षाचं स्वागत हे जोरदार पद्धतीनं केलं आहे. बॉलिवूड सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर फोटो शेअर करून चाहत्यांना त्यांच्या सेलिब्रेशनची झलक दाखवली आहे. दरम्यान बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रानं देखील आपले कुटुंब आणि मित्रांसह नवीन वर्ष साजरे केले आहे. प्रियांकासोबत तिची आई मधु चोप्रानं देखील नवीन वर्ष साजरे केले आहे. आता प्रियांकाचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

प्रियांका चोप्राचे फोटो व्हायरल : सोशल मीडियावर समोर आलेल्या एका फोटोमध्ये प्रियांकाचा पती निक जोनास नवीन वर्षाचं सेलिब्रेशन करताना दिसत आहे. याशिवाय दुसऱ्या एका फोटोंमध्ये प्रियांका आणि निकनं फंकी लूकमध्ये 'हॅपी न्यू इयर' चष्मा घातलेले आहे. या पार्टीमध्ये तिनं हिरव्या रंगाच्या ड्रेसवर काळ्या रंगाचं जॅकेट घातले आहे. या लूकमध्ये ती खूप सुंदर दिसत आहे. याशिवाय काही फोटोमध्ये प्रियांकाची आई मधु चोप्रा देखील आहे. त्यांनी या पार्टीमध्ये काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. याशिवाय या पार्टीमध्ये निक हा निळ्या रंगाच्या सुटमध्ये दिसत आहे. प्रियांकानं काबो, मेक्सिकोमध्ये तिचे नवीन वर्ष साजरे केले.

प्रियांका चोप्राचं वर्क फ्रंट : दरम्यान, केविन जोनासनेही पत्नी डॅनिएल जोनाससोबत मेक्सिकोमधील नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनचे दोन फोटो शेअर केले आहेत. काही दिवसांपूर्वी प्रियंका चोप्रानं मुलगी मालती मेरी चोप्रा जोनासचे काही सुंदर फोटोही सोशल मीडियावर शेअर केले होते. या फोटोमध्ये मालती एका आलिशान बीएमडब्लू (BMW) टॉय कारमध्ये बसलेली दिसत होती, ज्याच्या नंबर प्लेटवर तिचे नाव कस्टमाइझ केलं होतं. हे फोटो खुप सुंदर होते. दरम्यान प्रियांकाच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, ती शेवटी 'लव्ह अगेन'मध्ये सॅम ह्यूघन आणि सेलीन डायोन यांच्यासोबत दिसली होती. पुढं ती इद्रिस एल्बा आणि जॉन सीना यांच्यासोबत इलिया नैशुलरच्या आगामी अ‍ॅक्शन-कॉमेडी 'हेड्स ऑफ स्टेट्स'मध्ये दिसणार आहे.

हेही वाचा :

  1. आयरा खान आणि नुपूर शिखरे यांच्या हळदी समारंभात किरण राव मराठी लूकमध्ये उपस्थित
  2. माधुरी दीक्षित-नेनेनं सहकुटुंब घेतलं सिद्धिविनायकांचं दर्शन
  3. 'डंकी' लवकरच बॉक्स ऑफिसवर 400 कोटींचा टप्पा पार करणार!

ABOUT THE AUTHOR

...view details