मुंबई : ग्लोबल स्टार प्रियांका चोप्रा, अॅनी हॅथवे, झेंडया आणि 'ब्लॅकपिंक' ची के-पॉप गायिका लिसा यांनी 17 मे रोजी इटलीतील व्हेनिस येथे बल्गेरी या कार्यक्रमात एकत्र सहभाग घेतला. या कार्यक्रमातील चौघींचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताच अनेकांनी त्याच्या फोटोवर कमेंट केल्या आहे. त्यांना जागतिक मंचावर एकत्र पाहून चाहते खुश झाले आहे. या कार्यक्रमासाठी प्रियांका चोप्राने गुलाबी रंगाचा ऑफ-शोल्डर फुल स्लीव्हज ब्लाउज आणि हाफ साडी परिधान केली होती. झेंडयाने ऑफ शोल्डर सॅटिन ब्लॅक ड्रेस घातला होता. शिवाय लिसाने सुंदर नेकपीससह ऑफ-शोल्डर सॅटिनचा पोशाख परिधान केला होता, तर अॅनीने स्टायलिश नेकपीस आणि पेंडेंटसह गोल्ड-सिल्व्हर गाउन परिधान केला होता.
इटलीतील व्हेनिस येथे बल्गेरी या कार्यक्रमात प्रियंका : या कार्यक्रमात चौघीही एकत्र बसलेल्या होत्या. त्यानंतर रेड कार्पेटवर त्यांनी सर्वांनी एकत्र पोज दिली. मिळालेल्या माहितीनुसार, प्रियांका, अॅनी, झेंडया आणि लिसा या इटालियन ज्वेलरी ब्रँडच्या ग्लोबल ब्रान्ड अॅम्बेसेडर आहेत. याआधी प्रियंका ही चुलत बहीण परिणीती चोप्राच्या साखरपुड्यात सहभागी होण्यासाठी दिल्लीत आली होती. 15 मे रोजी कपूरथला हाऊसमध्ये 'आम आदमी पार्टी'चे नेते राघव चढ्ढासोबत परिणीतीचा साखरपुडा संपन्न झाली.