महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Priyanka Chopra Daughter Malti Marie : प्रियांकाने अखेरीस एका समारंभात मुलगी मालतीचा चेहरा केला उघड, मालती मेरी दिसते खुपच क्यूट - प्रियांका चोप्रा

बॉलीवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राने अखेर तिची मुलगी मालती मेरीचा चेहरा उघड केला. प्रियांका चोप्रा तिची मुलगी मालती मेरीसोबत हॉलिवूड वॉक ऑफ फेम स्टार समारंभात आली होती. या समारंभातून त्यांच्या मुलीची छायाचित्रे समोर आली आहेत. आता मालती मेरीचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

Priyanka Chopra Daughter Malti Marie
बॉलीवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा

By

Published : Jan 31, 2023, 10:49 AM IST

मुंबई : बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्राने अखेर तिच्या मुलीचा चेहरा उघड केला आहे. होय, बॉलीवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा आपली मुलगी मालती मेरीला हॉलिवूड वॉक ऑफ फेम स्टार समारंभात घेवून आली होती. आता प्रियांका चोप्रा आणि निक जोनासचे मालती मेरीसोबतचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. व्हायरल व्हिडिओमध्ये मालती मेरी खूपच क्यूट दिसत आहे. या फोटोंमध्ये प्रियांका आणि मालतीसोबत निक जोनासही दिसत आहे.

मालती मेरीचे नवीन फोटो : प्रियांका तिची मुलगी मालतीसोबत लॉस एंजेलिसमध्ये निक जोनासच्या हॉलीवूड वॉक ऑफ फेम स्टार सेरेमनीमध्ये दिसली होती. तिथे जोनास ब्रदर्सलाही पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यादरम्यान प्रियांका चोप्रा आपल्या मुलीला मांडीवर घेऊन स्टेजसमोर बसलेले फोटो कॅमेऱ्यात कैद झाले आहे. मालती मेरीचे हे नवीन फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.

सोशल मीडियावर धुमाकूळ : व्हायरल होत असलेल्या फोटोंमध्ये, प्रियांका आणि निकची राजकन्येने क्रीम रंगाचे स्वेटर आणि मॅचिंग शॉर्ट्ससह पांढरे हेअर बँड घातलेले दिसत आहेत. या फोटोत ती खूपच क्यूट दिसत आहे. दुसरीकडे, प्रियांका चोप्रा तपकिरी रंगाच्या बॉडीकॉन ड्रेसमध्ये स्टायलिश दिसत होती. या ड्रेसवर प्रियांकाने लाईट-टोन्ड मेकअप, चष्मा आणि सोनेरी कानातले घालून तिचा लूक पूर्ण केला. आई-मुलगी जोडीसह, सोफी टर्नर, केविन जोनासची पत्नी डॅनियलसह संपूर्ण जोनास कुटुंब या कार्यक्रमात स्पॉट झाले होते. हॉलिवूड वॉक ऑफ फेम इव्हेंटमधून समोर आलेल्या प्रियांका चोप्रा आणि मालती मेरीचे फोटो आता सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.

सरोगसीबद्दल खुलासा केला : प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांनी 1 डिसेंबर 2018 रोजी जोधपूरच्या उम्मेद भवन पॅलेसमध्ये लग्न केले होते. दोघांनी दिल्ली आणि मुंबईत रिसेप्शनही आयोजित केले होते. आणि 15 जानेवारी 2022 रोजी प्रियांकाने मुलीला जन्म दिला. एका वर्षानंतर, सोमवारी (30 जानेवारी) प्रियांकाने हॉलिवूड वॉक ऑफ फेम कार्यक्रमाच्या खास प्रसंगी तिच्या मुलीचा चेहरा सार्वजनिक केला आहे. बॉलिवूडसह हॉलिवूड गाजवणाऱ्या देसी गर्लने काही दिवसांपूर्वीच सरोगसीच्या माध्यमातून आई झाल्याची गुडन्यूज दिली. प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांनी अलीकडेच त्यांची मुलगी मालती मेरीचा पहिला वाढदिवस साजरा केला. नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत, अभिनेत्री प्रियांका चोप्राने तिच्या सरोगसीबद्दल खुलासा केला आहे.

हेही वाचा :देसी गर्ल प्रियांकाने सरोगसीबद्दल केला खुलासा; ट्रोलर्सला दिले सडेतोड उत्तर

ABOUT THE AUTHOR

...view details