लॉस एंजेलिस -अभिनेत्री प्रियांका चोप्राने तिचा अमेरिकन पॉप-स्टार पती निक जोनासला भेटण्यापूर्वी तिने अनेक पुरुषांना डेट केले आहे. तिला तिच्या प्रत्येक नात्यामध्ये पाहिजे तसे काही मिळाले नाही. तिने अनेक पुरुषांना डेट केले, मात्र तिला काही काळानंतर ती 'डोरमेट' असल्यासारखे वाटत होते, असे तिने कॉल हर डॅडी पॉडकास्टच्या एका एपिसोडमध्ये सांगितले. प्रियंकाने अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केली आहे. बॉलिवूडमध्ये ती 23 वर्षांपासून काम करत आहे. प्रियंका ही अनेक वेळा मीडियासमोर बिनधास्त गोष्टी सांगत असते, असे तिने या कार्यक्रमात खुलासे केले.
प्रियांका स्वतःला समजत होती 'डोअरमेट' : तिला या कार्यक्रमात विचारण्यात आले की. रोमँटिक जोडीदाराची निवड करण्याचा काही पॅटर्न आहे का? त्यावर तिने सांगितले 'मी नात्यामधून अनेक नात्याकडे गेले. मात्र मी या नात्यानां पाहिजे तसा वेळ दिला नाही. मी ज्या ठिकणी काम करत होते किंवा ज्या चित्रपटासाठी काम करायचे, अशा अनेक व्यक्तीबरोबर नाते जोडली आहे. माझ्या शेवटच्या नात्याला मी वेळ दिला. माझ्या सेटवर भेटलेल्या कलाकारांना मी नेहमीच डेट करत होते. मी विचार केला होता आणि मला अंदाज होता की नातं कसे असायला पाहिजे. मी नेहमी प्रयत्न करायची की माझ नातं कसे टिकवून राहील.