महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

PC with daughter Malti Marie : आई ग्लॅमरस दिसण्यासाठी प्रियांकाच्या चिमुरडीने हाती घेतला मेकअप ब्रश - Priyanka Chopra drops picture with daughte

ग्लोबल आयकॉन प्रियांका चोप्रा जोनासने तिच्या चाहत्यांना तिची मुलगी मालती मेरीचा आणखी एक सुंदर फोटो शेअर केला आहे. यामध्ये लहान मालती तिच्या आईला तिच्या हातात मेकअप ब्रश घेऊन ग्लॅम होण्यास मदत करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे.

प्रियांकाच्या चिमुरडीने हाती घेतला मेकअप ब्रश
प्रियांकाच्या चिमुरडीने हाती घेतला मेकअप ब्रश

By

Published : Mar 28, 2023, 12:43 PM IST

मुंबई -प्रियांका चोप्रा ही केवळ एक प्रतिभावान अभिनेत्री नाही तर एक समर्पित आई देखील आहे. ती आपली मुलगी मालती मेरीचे फोटो वारंवार पोस्ट करत असते. अलीकडेच, प्रियांकाने तिच्या लहान परीसोबतचा एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये ती मुलीसोबत खेळताना दिसत आहे तर तिची मुलगी मालती मेरी हातात मेकअप ब्रश घेऊन खेळत आहे.

हा फोटो लंडनमध्ये घेण्यात आला होता. प्रियांकाने पोस्टला कॅप्शन दिले: 'ग्लॅम विथ मामा. एमएम.' प्रियांका आणि मालती यांच्यावर कमेंट सेक्शनमध्ये तिच्या इन्स्टग्राम फॉलोअर्सनी गर्दी केली असेल हे सांगयची आवश्यकता नाही. प्रियांकाने यापूर्वी इन्स्टाग्राम स्टोरीजवर 'बेडटाइम स्टोरीज' या कॅप्शनसह तिची मुलगी मालतीचा फोटो शेअर केला होता. फोटोमध्ये मालती बेडवर आरामात आणि सुंदर झोपलेली दिसत आहे.

काही वेळ सुट्टी घेऊन, प्रियांका आणि निक त्यांची लहान मुलगी मालतीशिवाय डिनर डेटवर गेले. तिने त्यांच्या डिनर डेटचा एक व्हिडिओ शेअर केला ज्यामध्ये दोघेही थकलेले दिसले. व्हिडिओ शेअर करताना, ग्लोबल स्टारने कॅप्शन दिले: जेव्हा आई आणि वडील शनिवारची रात्र साजरी करण्याचा प्रयत्न करतात. 2022 मध्ये प्रियांका आणि निक आई-वडील झाले. मालती मेरी या जोडप्याची एकुलता एक मुलगी आहे. तिचा जन्म सरोगसीद्वारे झाला आहे. तिच्या जन्मापासून ही चिमुरडी सेलेब्रिटी किड बनली आहे. बराच काळ तिचा चेहरा प्रियंका आणि निक जोनासने लपवला होता. तिच्या अनेक पोस्टमध्ये मुलीच्या झाकल्या चेहऱ्याचेच फोटो त्यांनी शेअर केले होते.

द रुसो ब्रदर्सची टेलिव्हिजन मालिका सिटाडेल, ज्यामध्ये प्रियांका मुख्य भूमिका साकारणार आहे, शुक्रवार, 28 एप्रिल रोजी प्राइम व्हिडिओवर दोन अ‍ॅक्शन-पॅक भागांसह पदार्पण करणार आहे. त्यानंतर, 26 मे पर्यंत दर शुक्रवारी एक नवीन भाग प्रदर्शित केला जाईल. ही कथा सिटाडेल, मेसन केन (रिचर्ड मॅडेन) आणि नादिया सिन्ह (प्रियांका) या जगभरातील गुप्त एजन्सीच्या दोन उच्चभ्रू एजंट्सभोवती केंद्रित आहे. तिच्याकडे फरहान अख्तरचा जी ले जरा हा चित्रपटही आहे.

हेही वाचा -Ram Charan's Birthday Bash : राम चरणच्या बर्थ डे पार्टीत उपासनाचा बेबी बंप फ्लॉंट, राजामौलीसह दिग्गज सेलेब्रिटींची मांदियाळी

ABOUT THE AUTHOR

...view details