वॉशिंग्टन ( यूएस ) - अभिनेत्री प्रियंका चोप्रा आजवर तिची मुलगी मालती मेरीचा चेहरा मीडियापासून लपवला आहे. मात्र नेहमी ती मुलीचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते. आता तिने पोस्ट केलेल्या फोटोत तिने मुलीचा ओझरता चेहरा दाखवण्याचा प्रयत्न केलाय. त्यामुळे तिच्या मुलीबद्दलची चाहत्यांची उत्कंठा वाढीस लागली आहे.
प्रियांका चोप्राने बुधवारी पहाटे तिची मुलगी मालती मेरी चोप्रा जोनासचा फोटो शेअर केला. इंस्टाग्राम स्टोरीवर प्रियांकाने एक फोटो शेअर केला ज्यावर तिने कॅप्शन दिले, "आय मिन...," त्यानंतर हार्ट आय इमोटिकॉन.
प्रियंका चोप्राने मुलगी मालती मेरीच्या चेहऱ्याबद्दलची वाढवली उत्कंठा फोटोमध्ये प्रियांकाने तिच्या मुलीचा अर्धा चेहरा दाखवला असून डोक्यावरील उबदारी टोपीने बाळाच्या डोळ्यावरील भाग झाकला आहे.
प्रियांका आणि गायक निक जोनास यांनी 1 आणि 2 डिसेंबर 2018 रोजी जोधपूरच्या उम्मेद भवन पॅलेसमध्ये ख्रिश्चन आणि हिंदू पद्धतीने विवाह केला. नंतर, या जोडप्याने दिल्ली आणि मुंबईमध्ये दोन रिसेप्शन देखील आयोजित केले. जानेवारी 2022 मध्ये, दोघांनी जाहीर केले की त्यांनी सरोगसीद्वारे मुलगी मालती मेरीचे स्वागत केले.
दरम्यान, वर्क फ्रंटवर, प्रियांका 'इट्स ऑल कमिंग बॅक टू मी' आणि 'सिटाडेल' या मालिकेसारख्या आंतरराष्ट्रीय प्रकल्पांमध्ये दिसणार आहे. रुसो ब्रदर्स निर्मित, 'सिटाडेल' प्राइम व्हिडिओवर रिलीज होईल. या आगामी साय-फाय ड्रामा सिरीजचे दिग्दर्शन पॅट्रिक मॉर्गन करत आहेत आणि प्रियांकासोबत रिचर्ड मॅडन हे कलाकार आहेत. बॉलीवूडमध्ये, ती फरहान अख्तरच्या 'जी ले जरा' मध्ये आलिया भट्ट आणि कॅटरिना कैफ सोबत काम करणार आहे.
हेही वाचा -'शेहजादा'चा टीझर रिलीज, कार्तिक आर्यनची चाहत्यांना बर्थडेची रिटर्न गिफ्ट