मुंबई - सुष्मिता सेनचा बहुचर्चित 'ताली' ही वेब सिरीज १५ ऑगस्ट पासून प्रसारित होणार आहे. यात ती ट्रान्स जेंडरच्या हक्कासाठी लढणाऱ्या श्रीगौरी सावंतची भूमिका साकारत आहे. या मालिकेच्या ट्रेलरमध्ये तिचा दिसणारा आत्मविश्वास आणि लूक याचे खूप कौतुक केले जात आहे. तिचा 'ताली'च्या प्रमोशन दरम्यान असलेला वावर अनेकांना मोहित करत असून अनेक यशस्वी महिलांसह तिची सहकारी अभिनेत्री प्रियांका चोप्राही प्रभावित झाली आहे.
अलीकडे दिलेल्या एका मुलाखतीत, सुष्मिताला तिच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात, टीका हाताळण्याच्या तिच्या दृष्टिकोनाबद्दल विचारण्यात आले होते. १९९४ मध्ये प्रतिष्ठित मिस युनिव्हर्स खिताब मिळवून सुष्मिताने चित्रपटसृष्टीमध्ये प्रवेश केल्यामुळे हा काळ तिच्या स्मरणात कायमचा आहे. या प्रश्नावर तिच्यात असलेली विनोद बुद्धी आणि हजर जबाबीपणा पुन्हा एकदा स्पष्ट झाला. यामुळे तिची अनेकांनी वाहवा केली, यात माजी मिस वर्ल्ड आणि आता ग्लोबल आयकॉन प्रियांका चोप्रा हिचाही समावेश होता.
सुष्मिताचा हा मुलाखतीचा व्हिडिओ सोशल मीडियावर फिरत आहे. यामध्ये ती ९० च्या दशकात तिच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या गोष्टींबद्दल बोलताना दिसते. कोणत्याही टीकेला कसे सामोरे जायचे याची शिकवण तिला यातून मिळाली होती. लोकांना विचारलेला प्रश्न लक्षात राहात नाही तर आपण दिलेले उत्तर निर्णायक असते, हा धडाच तिने यानिमित्ताने तिने गिरवला होता.
याबद्दल बोलताना सुष्मिता म्हणाली, कारकिर्दीच्या सुरुवातीलाच मला कोणीतरी सांगितले की, मी २१ वर्षाची असावी. हे कोण म्हटले हे मला माहिती आहे पण मी नाव सांगणार नाही. ते मला म्हणाले की, 'एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, कोणीही कितीही अनादराने तुला प्रश्न विचारला तर त्याला आदरानेच उत्तर दे, कारण इतिहासात तो प्रश्न गणला जात नाही, तर तू दिलेल्या उत्तराची नोंद होत असते. हे माझ्या मनाला खूप भावले.'
'माझ्या कारकिर्दीच्या सुरुवातीला मला कोणीतरी सांगितले, त्यावेळी मी २१ वर्षांची असावी. हे कोणी सांगितले हे मला माहीत आहे, पण मी त्यांचे नाव घेणार नाही. ते मला म्हणाले, 'तुला कितीही अनादराने प्रश्न विचारला गेला तरी नेहमी लक्षात ठेव. तुला नेहमी आदराने उत्तर द्यावे लागेल कारण इतिहास त्या प्रश्नाची नोंद ठेवणार नाही, तो तुमचे उत्तर नोंदवून ठेवेल.' - सुष्मिता सेन