महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

प्रियांका चोप्रानं सुरू केली ख्रिसमसची तयारी, निक जोनास आणि मालती मेरीसोबतचे फोटो केले शेअर - प्रियांका चोप्रा लेटेस्ट फोटो

Priyanka Chopra Christmas pictures : प्रियांका चोप्राने तिच्या ख्रिसमस सणाची पती निक जोनास आणि मुलगी मालती मेरीसह तयारी करत आहे. तिने इन्स्टाग्रामवर काही सुंदर फोटो पोस्ट केले आहेत. यावर चाहत्यांनी भरपूर शुभेच्छांसह प्रेमळ कमेंट्स केल्या आहेत.

Priyanka Chopra Christmas pictures
प्रियांका चोप्रानं सुरू केली ख्रिसमसची तयारी

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 23, 2023, 2:59 PM IST

मुंबई- Priyanka Chopra Christmas pictures : सोशल मीडियावर अतिशय सक्रिय असलेल्या प्रियांका चोप्रानं अलीकडेच कौटुंबिक जीवनाची झलक शेअर करून तिच्या चाहत्यांना आनंद दिला. 2023 च्या ख्रिसमस सणाच्या पार्श्वभूमीवर तिनं निक जोनास आणि जवळच्या मित्रांच्या सहवासात सणासुदीच्या डिनरचा आनंद लुटला. या सुंदर क्षणांचे फोटो तिनं इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

प्रियांकानं तिचा नवरा, निक जोनास आणि जवळच्या मित्रांच्या सहवासात सणासुदीच्या डिनरचा आनंद लुटला. तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केलेल्या सुंदर फोटोमध्ये हे आनंदी क्षण टिपले गेले आहेत. या फोटोंमध्ये प्रियांका, निक जोनास, त्यांची मुलगी मालती मेरी चोप्रा जोनास आणि त्यांचे मित्र आगामी ख्रिसमसच्या सेलिब्रेशनची तयारी करताना दिसतात. फोटोंच्या मालिकेत प्रियांका सुंदर पांढर्‍या पोशाखामध्ये काळ्या रंगाच्या ब्लेझर आणि कॅज्युअल पोशाखात दिसणाऱ्या निकसोबत हसत पोज देताना दिसत आहे.

याव्यतिरिक्त, प्रियांकाने मुलगी मालती मेरीचे गोड फोटो शेअर केले. ती तिच्या खेळण्यांच्या कारसह खेळण्यात मग्न दिसतेय. आई आणि मुलीचे सुंदर क्षण एन्जॉय करतानाचेही यामध्ये फोटो आहेत. यापूर्वी, प्रियांकाने इंस्टाग्राम स्टोरीतून त्यांच्या ख्रिसमसच्या तयारीची झलक दाखवली होती. यात तिने दिवे, दागिने आणि उत्सवाच्या सजावटींनी सजलेले सुंदर सुशोभित फायरप्लेस कॉर्नर दाखवले होते.

या पोस्टवर चाहत्यांकडून शुभेच्छा आणि उत्सवाच्या शुभेच्छांचा वर्षाव झालेला दिसत आहे. शेअर केलेल्या फोटोंमधील प्रियांका आणि निक यांच्यातील प्रेमळ बंधाची युजर्सनी प्रशंसा केली. खास करुन प्रियांकाला मिठी मारत असलेल्या निकच्या एका फोटोवर चाहत्यांनी भरपूर प्रतिक्रिया दिल्या आहेत. फोटोंवर प्रतिक्रिया देताना एका चाहत्याने लिहिले, "पहिल्या फोटोने माझे हृदय चोरले आहे. प्रत्येक माणूस जेव्हा त्याच्या प्रिय व्यक्तीसोबत असतो तेव्हा तो लहान होतो."

कामाच्या आघाडीवर प्रियांका चोप्रा सॅम ह्यूघन आणि सेलीन डीओन यांच्यासमवेत रुसो ब्रदर्सचा 'सिटाडेल' आणि हॉलीवूड चित्रपट 'लव्ह अगेन'मध्ये झळकली होती. प्रियांकाचे 2023 हे व्यावसायिक वर्ष धमाकेदार गेले. याव्यतिरिक्त ती जॉन सीना आणि इद्रिस एल्बा यांच्यासोबत 'हेड्स ऑफ स्टेट'मध्ये दिसणार आहे. तर बॉलीवूडच्या आघाडीवर प्रियांका आगामी फरहान अख्तर दिग्दर्शित चित्रपटात दिसणार आहे. तिच्या तारखांमुळे हा चित्रपट रेंगाळला आहे.

हेही वाचा -

  1. प्रभासच्या 'सालार' वादळापुढे अडखळला शाहरुखचा 'डंकी', कमाईत घसरण
  2. प्रभास स्टारर 'सालार'ने पहिल्या दिवशीच्या कमाईचे सर्व अंदाज ओलांडले
  3. 'कल्कि 2898 एडी' पासून 'पुष्पा 2' पर्यंत हे 10 साऊथ चित्रपट 2024 मध्ये होतील प्रदर्शित

ABOUT THE AUTHOR

...view details