मुंबई Priyanka Chopra and Nick Jonas : ग्लोबल आयकॉन स्टार प्रियांका चोप्रा आणि तिचा पती निक जोनास हे सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. त्यांचे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात फॉलोअर्स आहेत. अनेकदा हे जोडपं त्यांची मुलगी मालती मेरीसोबतचे गोंडस फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतं. दरम्यान सोमवारी सकाळी प्रियांकाने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीजवर काही खास फोटो शेअर केले आहेत. प्रियांकाने फोटोला खूप आकर्षक कॅप्शन दिले आहेत. शेअर केलेल्या फोटोंमध्ये प्रियांका आणि निक खूप मोहक दिसत आहेत.
प्रियांकाने शेअर केले फोटो : प्रियांका पेस्टल निळ्या रंगाच्या पोशाखात आहे. या लूकवर तिने बन बांधला आहे. तसंच तिने हिऱ्याच्या झुमक्यासह एक सुंदर नेकलेस घातले आहे. यावर तिने तिचा मेकअप कमीत कमी ठेवला असून लिपस्टिक ही बेबी पिंक रंगाची लावली आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिनं 'आईस आईस बेबी' असं लिहिलं आहे. आणखी एका सेल्फीमध्ये हे जोडपं कारमध्ये पोझ देताना दिसत आहे. या फोटोला तिने कॅप्शन 'ऑस्टिन, टेक्सासला लवकरच भेटू' असं लिहलं आहे. दरम्यान, फोटोत निक जोनास कारच्या काचेतून बाहेर पाहात असल्याचं दिसत आहे. या फोटोवर तिने 'स्वप्नमय,' कॅप्शन देत इमोजी पोस्ट केला आहे.