महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

प्रियांका आणि निक जोनासने समुद्रात अनुभवले रोमँटिक क्षण - priyanka chopra and nick jonas

प्रियांका चोप्रा आणि निक जोनास समुद्रात रोमँटिक क्षण अनुभवताना दिसले. कपल येथे सुट्टीचा आनंद घेत आहे.

प्रियांका चोप्रा आणि निक जोनास
प्रियांका चोप्रा आणि निक जोनास

By

Published : Jul 12, 2022, 10:45 AM IST

मुंबई - ग्लोबल स्टार प्रियांका चोप्रा सध्या तिच्या पतीसोबत रोमँटिक क्षणांचा आनंद घेत आहे. प्रियांका आणि निक जोनासच्या रोमँटिक क्षणांचे नवीन फोटो सोशल मीडियावर फिरत आहेत. हे फोटो खूप सुंदर आहेत. प्रियांका चोप्रा आणि निक जोनासच्या या फोटोंमध्ये प्रेमाची केमिस्ट्री तयार झालेली दिसते. या फोटोंना शेअर करत त्यांनी 'मॅजिक अवर' असे कॅप्शन दिले आहे.

सोशल मीडियावरील फोटोमध्ये निक आणि प्रियांका एका नौकेवर आहेत. ही नौका समुद्राच्या मध्यभागी दिसत आहे. याकडे निक आणि प्रियांकाशिवाय कोणीही पाहत नाही. येथे जादुई क्षणांचा आनंद घेत असलेले हे जोडपे, समुद्राच्या मध्यभागी एकमेकांमध्ये मग्न झालेले दिसले.

लूकबद्दल बोलायचे झाले तर निक काळ्या रंगाच्या आउटफिटमध्ये एकदम मस्त दिसत आहे. दुसरीकडे, प्रियांका चोप्राने केशरी रंगाचा सेट घातला आहे आणि वरून काळे जॅकेट आहे. या जोडप्याला नौकेवर किती मजा येत आहे हे दोघांमधील केमिस्ट्री पाहूनच कळते. आता या फोटोंवर दोघांचे चाहते त्यांचे प्रेमव्यक्त करीत आहेत. प्रियांका चोप्राचे अनेक चाहते तिची जोडी सुंदर असल्याचे सांगत आहेत, तर अनेक चाहत्यांनी या जोडप्यासाठी हार्ट इमोजी शेअर केले आहेत. बॉलिवूड सेलिब्रिटींनी या फोटोंवर लाईक बटण दाबले आहे.

हेही वाचा -अक्षय कुमारने शेअर केले रक्षाबंधन सेटवरील Bts फोटो

ABOUT THE AUTHOR

...view details