महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

प्रियांका चोप्रा आणि निक जोनासने बीचवर मुलगी मालती मेरीचा वाढदिवस केला साजरा - मालती मेरीचा वाढदिवस

Priyanka Nick Celebrates Malti Marie Birthday : अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि हॉलिवूड गायक-अभिनेता निक जोनासची मुलगी मालती जोनासचा 15 जानेवारी रोजी वाढदिवस साजरा झाला. दरम्यान, आता त्याचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Priyanka Nick Celebrates Malti Marie Birthday
प्रियांका निकनं मालती मेरीचा वाढदिवस साजरा केला

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 16, 2024, 2:39 PM IST

Updated : Jan 16, 2024, 2:54 PM IST

मुंबई - Priyanka Nick Celebrates Malti Marie Birthday : ग्लोबल स्टार प्रियांका चोप्रा आणि हॉलिवूड गायक-अभिनेता निक जोनास यांची लाडकी मुलगी मालती मेरी चोप्रा जोनास 15 जानेवारी रोजी दोन वर्षांची झाली. मालतीचा दुसरा वाढदिवस प्रियांका आणि निकनं लॉस एंजेलिसच्या बीचवर साजरा केला. दरम्यान, या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनमध्ये या जोडप्याच्या कुटुंबातील सदस्य आणि मित्रमंडळी समुद्र किनाऱ्यावर आनंद साजरा करताना दिसत आहेत. प्रियांका चोप्रा, मालती आणि निकचे काही फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. एका शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये मालती मस्ती करताना दिसत आहे.

मालती मेरी जोनासचा वाढदिवस : बर्थडे गर्ल मालतीची झलक प्रियांका आणि निकच्या चाहत्यांना खूप आवडली आहे. पार्टीत निकचा भाऊ फ्रँकी जोनासही दिसत आहे. शेअर केलेल्या पहिल्या फोटोमध्ये प्रियांकाची मुलगी मालती आणि पती निकसह कुटुंबातील सदस्यांसोबत एंजॉय करताना दिसत आहे. शेअर केलेल्या व्हिडिओत समुद्र किनारी प्रियांका आणि निक चालताना दिसत आहेत. आता अनेकजण या पोस्टवर कमेंट्स करत आहेत. प्रियांकाचे हे फोटो आणि व्हिडिओ सुंदर आहेत.

प्रियांका चोप्राचं वर्कफ्रंट : प्रियांकाच्या पोस्टवर एका चाहत्यानं कमेंट करत लिहिलं, ''वाढदिवसाच्या शुभेच्छा मालती, खूप सुंदर फोटो आहेत.'' दुसऱ्या एका चाहत्यानं लिहिलं, '' प्रियांका आणि मालती जोडी हिट आहे. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.'' आणखी एका चाहत्यानं लिहिलं, ''मालती खूप गोड आहे.'' अशा अनेक कमेंट्स या पोस्टवर येत आहेत. याशिवाय काहीजण या पोस्टवर हार्ट इमोजी पोस्ट करत मालतीवर प्रेमाचा वर्षाव करताना दिसत आहेत. दरम्यान 2021 मध्ये प्रियांका चोप्रानं सरोगसीद्वारे तिच्या पहिल्या मुलाचं स्वागत केलं. त्यानंतर तिनं ही खुशखबर इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करून दिली. प्रियांका चोप्राच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचं तर ती लवकरच अ‍ॅक्शन-कॉमेडी 'हेड्स ऑफ स्टेट्स'मध्ये दिसणार आहे. यासोबतच ती फरहान अख्तरचा 'जी ले जरा'मध्येही असेल. या चित्रपटामध्ये प्रियांका चोप्रासह आलिया भट्ट आणि कतरिना कैफ रुपेरी पडद्यावर खळबळ माजवताना दिसणार आहेत.

हेही वाचा :

  1. महेश बाबूनं चाहत्यांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देत केलं 'गुंटूर कारम'च्या यशाचे सेलिब्रेशन
  2. 75 व्या एमी पुरस्कार सोहळ्यात दिवंगत मॅथ्यू पेरीचा 'फ्रेंड्स थीम सॉन्ग'ने सन्मान
  3. 'अ‍ॅनिमल'च्या ओटीटी रिलीजची तारीख ठरली, पण नफ्यातील वाटयासाठी सहनिर्मात्यांमध्ये कॅटफाईट
Last Updated : Jan 16, 2024, 2:54 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details