महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

‘पृथ्वीराज’ दिग्दर्शक डॉ. चंद्रप्रकाश द्विवेदी यांनी सांगितला चित्रपटाच्या बजेटचा किस्सा - पृथ्वीराज चित्रपट निर्मिती

डॉ चंद्रप्रकाश द्विवेदी यांनी या विषयावर तब्बल १४ वर्षे संशोधन केले आहे. त्यांना ‘पृथ्वीराज’ वर चित्रपट बनवायचा होता परंतु निर्माता मिळत नव्हता. त्यांना कमीतकमी १०० कोटींचं बजेट हवं होतं आणि ते देण्यास कुठलाही निर्माता तयार होत नव्हता. या ‘पृथ्वीराज’ चित्रपटाच्या जन्माविषयी त्यांनी एक किस्सा कथन केला.

पृथ्वीराज
पृथ्वीराज

By

Published : May 12, 2022, 3:35 PM IST

मुंबई- नुकताच अक्षय कुमार अभिनित ‘पृथ्वीराज’ या ऐतिहासिक चित्रपटाचा ट्रेलर अनावरण सोहळा अत्यंत थाटामाटात करण्यात आला. या चित्रपटातून विश्वसुंदरी मानुषी छिल्लर चित्रपटसृष्टीत पदार्पण करीत असून या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन डॉ चंद्रप्रकाश द्विवेदी यांनी केले आहे. ते म्हणाले की, “जेव्हा हा सिनेमा बनवायचा ठरला तेव्हा शीर्षक भूमिकेसाठी पहिले नाव अक्षय कुमारचेच होते. तसेच मानुषीच्या सौंदर्यावर संपूर्ण जगाने शिक्कामोर्तब केले आहे. त्यामुळे सौंदर्यवती राणी संयोगिताच्या भूमिकेत ती चपखल बसेल याची खात्री होती. त्यामुळेच तिची निवड या भूमिकेसाठी करण्यात आली. मध्यंतरीच्या कोरोना काळात चित्रपट बनायला उशीर झाला. परंतु आता ‘पृथ्वीराज’ चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होण्यास सज्ज झाला आहे.”

डॉ चंद्रप्रकाश द्विवेदी यांनी या विषयावर तब्बल १४ वर्षे संशोधन केले आहे. त्यांना ‘पृथ्वीराज’ वर चित्रपट बनवायचा होता परंतु निर्माता मिळत नव्हता. त्यांना कमीतकमी १०० कोटींचं बजेट हवं होतं आणि ते देण्यास कुठलाही निर्माता तयार होत नव्हता. या ‘पृथ्वीराज’ चित्रपटाच्या जन्माविषयी त्यांनी एक किस्सा कथन केला. झालं असं होतं की त्यांना एका चित्रपटाच्या कथेवर काम करण्यासाठी यशराज फिल्म्सच्या आदित्य चोप्रा यांनी बोलावलं होतं. त्यांची त्यावर चर्चा झाली आणि दोघांनी मिळून त्या चित्रपटाचे लेखन करण्याचे ठरले.

आणि पुढे काय घडले त्याबद्दल लेखक दिग्दर्शक डॉ चंद्रप्रकाश द्विवेदी म्हणाले की, "मला शक्यतो कुठल्याही निर्मात्याच्या ऑफिसमध्ये एन्ट्री मिळत नव्हती. आदित्य चोप्राने मला एका ऐतिहासिक चित्रपटाच्या लेखनासाठी बोलावले होते जो आम्ही दोघांनी लिहिण्याचे ठरविले होते. चारच दिवसांत मला त्यांना भेटण्याचा निरोप मिळाला. मी सांगितले की मला थोडंतरी वाचायला वेळ द्या. मी तर काहीच तयारी केली नव्हती म्हणून मला आश्चर्य पण वाटले. परंतु ज्याने निरोप दिला तो म्हणाला की आदित्य चोप्रांनी तातडीने भेटण्यास सांगितले आहे.”

“मी यशराजच्या ऑफिसमधील चवथ्या माळ्यावरील त्यांच्या ऑफिसमध्ये त्यांना भेटण्यासाठी गेलो. भेटल्यावर त्यांनी मला जवळपास दरडावले आणि विचारले की तुम्हाला तुमचा चित्रपट बनवायचा होता तर मला का सांगितले नाही? मी म्हणालो की मी बनविणार असलेल्या चित्रपटाचे बजेट १०० कोटींच्या पुढे आहे. त्यांनी विचारले की कुठल्या विषयावर? मी त्यांना शनिवार आणि रविवार स्क्रिप्ट ऐकविली आणि सोमवारी ‘पृथ्वीराज’ बनविण्याचे त्यांनी नक्की केले,” असे डॉ चंद्रप्रकाश द्विवेदी म्हणाले.

अक्षय कुमार अभिनित भव्य दिव्य ‘पृथ्वीराज’ येत्या ३ जून ला प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा -कानांना सुख देणारा 'लाल सिंग चड्ढा'मधील 'मैं की करां?' ट्रॅक रिलीज

ABOUT THE AUTHOR

...view details