मुंबई -अक्षय कुमारच्या ( Akshay Kumar ) आगामी 'पृथ्वीराज' ( Prithviraj ) चित्रपटाच्या निर्मात्यांनी सोमवारी ऐतिहासिक चित्रपटाच्या ट्रेलरचे अनावरण केले. हा चित्रपट पृथ्वीराज चौहान ( Samrat Prithviraj Chauhan ) यांच्या अतुलनीय शौर्य आणि धैर्याला आदरांजली असल्याचे म्हटले जाते. ट्रेलरमध्ये पृथ्वीराज चौहान यांनी लढलेल्या महाकाय युद्धांची आणि त्यांनी दाखवलेल्या धैर्याची झलक दिसते. यात अभिनेता संजय दत्त आणि सोनू सूद ( Sanjay Dutt and Sonu Sood ) यांनी साकारलेल्या ऐतिहासिक व्यक्तीरेखांचीही झलक यात पाहायला मिळते.
पृथ्वीराज हा चित्रपट सम्राट पृथ्वीराज चौहान यांच्या जीवनावर आणि शौर्यावर आधारित आहे. घोरच्या निर्दयी आक्रमणकर्त्या मुहम्मदविरुद्ध पराक्रमाने लढणाऱ्या योद्ध्याची भूमिका अक्षय साकारत आहे. मानुषी छिल्लर ( Manushi Chhillar ) तिच्या प्रिय संयोगिताची भूमिका साकारत आहे आणि तिचा हा बॉलिवूड पदार्पणाचा चित्रपट आहे.