मुंबई- पंतप्रधान नरेंद्र मोदी 17 सप्टेंबर रोजी त्यांचा 72 वा वाढदिवस साजरा करत आहेत. यानिमित्ताने त्याचे चाहते त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. बॉलिवूड सेलिब्रिटींनीही सोशल मीडियावर शुभेच्छा दिल्या आहेत. अनुपम खेर ते कंगना रणौत यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी पंतप्रधान मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
मोदी यांचे अभिनंदन करताना अनुपम खेर यांनी लिहिले, ''आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी! तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन! परमेश्वर तुम्हाला उदंड आणि निरोगी आयुष्य देवो! तुम्ही तुमच्या शपथेनुसार घेतलेली प्रत्येक जबाबदारी पार पाडण्यासाठी झटत आहात आणि पुढील अनेक वर्षे करत राहाल! तुमच्या नेतृत्वाबद्दल धन्यवाद!''
कंगना रणौतने तिच्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये पंतप्रधान मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना लिहिले आहे की, "लहानपणी चहा विकल्यापासून आणि पृथ्वीवरील एक शक्तिशाली माणूस बनण्यापर्यंत, तुमचा किती अतुलनीय प्रवास आहे, तुम्हाला दीर्घायुष्य लाभो, अशी प्रार्थना मी करते. "