महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Pride Month 2023: LGBTQ+ समुहाच्या विषयावर बनलेले बॉलिवूड चित्रपट - मार्गारिटा विथ अ स्ट्रॉ

एलबीटीच्या विषयावरील अनेक चित्रपट बनवले असून या समुहाबद्दल सहानुभुती देण्यासाठी चित्रपटांनी निर्णयक कामगिरी केली आहे. जून महिना हा प्राइड मंथ म्हणून ओळखला जातो. एलजीबीटी विषयावर बनलेल्या काही चित्रपटांवर एक नजर टाकूयात.

Pride Month 2023
LGBTQ+ समुहाच्या विषयावर बनलेले बॉलिवूड चित्रपट

By

Published : Jun 1, 2023, 5:03 PM IST

मुंबई- जून महिना हा प्राइड मंथ म्हणून जगभर ओळखला जातो. या दरम्यान विविध लैंगिक प्रवृत्तीचे लोक एखाद्याचे लैंगिक अभिमुखता व्यक्त करण्यासाठी समुहाने परेड मार्च करतात. बॉलिवूडने एलबीटीच्या विषयावरील अनेक चित्रपट बनवले असून या समुहाबद्दल सहानुभुती देण्यासाठी त्याचा मोठा प्रभाव प्रेक्षकांवर पडला आहे. यावर्षी 1 जून ते 30 जून या प्राइड मंथच्या निमित्ताने, समलैंगिकतेवर बनलेल्या अभिमानास्पद चित्रपटांवर एक नजर टाकूयात.

1. बधाई दो

बधाई दो

अलिकडेच प्रदर्शित झालेल्या हर्षवर्धन कुलकर्णी दिग्दर्शित बधाई दो या चित्रपटामध्ये राजकुमार राव आणि भूमी पेडणेकर मुख्य भूमिकेत होते. त्यात 'लॅव्हेंडर मॅरेज' या विय़,याच्या काही अंशी चित्रण करण्यात आले. एकमेकांशी लग्न करण्याचा निर्णय घेणाऱ्या दोन समलैंगिक व्यक्तींबद्दलची गोष्ट यात मांडण्यात आली होती. समलैंगिक व्यक्ती पुराणमतवादी लोकांशी झगडताना कशी तडजोड करतात हे यात दाखवण्यात आले होते.

2. अलीगढ

अलीगढ

हंसल मेहता दिग्दर्शित अलीगढ हा चित्रपट 2015 मध्ये प्रदर्शित झाला. प्राध्यापक रामचंद्र सिरास यांच्या खऱ्या आयुष्यावर आधारित या चित्रपटाची कथा होती. ही भूमिका मनोज बाजपेयी यांनी अतिशय समर्थपणे साकारली होती. प्राध्यपकाचा रिक्षा चालकाशी घनिष्ट संबंध असल्याच्या कारणास्तव अलीगढ विद्यापीठाने बंदी घातली होती. या घटनेनंतर त्याचा समाजाने हिंसकपणे अपमान केला आणि त्याची टिंगल केली. या विषयाचे सहानुभूतीपूर्वक आणि वास्तववादी पद्धतीने चित्रण केल्याबद्दल चित्रपटाला अनेक पुरस्कारंना सन्मानित करण्यात आले होते. राजकुमार रावने यात पत्रकार दीपू सेबॅस्टियनची भूमिका साकारली आणि सिरासच्या न्यायासाठी लढा दिला होता.

3. एक लडकी को देखा तो ऐसा लगा

एक लडकी को देखा तो ऐसा लगा

समलैंगिक प्रेमसंबंधांचे वर्णन एका मोठ्या चित्रपटात दाखवण्यात आल्याची ही पहिलीच वेळ होती. शेली चोप्रा धर दिग्दर्शित या चित्रपटात सोनम कपूर, अनिल कपूर आणि राजकुमार राव यांनी भूमिका साकारल्या होत्या. स्विटी चौधरी, पारंपारिक पंजाबी घरात जन्मलेली आणि वाढलेली एक निष्पाप आनंदी मुलगी असते. तिला लहानपणापासूनच वधू बनण्याची इच्छा होती. पण जसजशी ती मोठी होत जाते, तसतसे तिला कळत जाते की तिला दुसरीकडे नवरा नको आहे. चित्रपटात स्वीटीच्या कुटुंबाचा आणि समाजाचा तिच्या समलैंगिकतेला तीव्र नकार दाखवण्यात आला. चित्रपटाच्या शेवटी स्वीटी तिच्या प्रिय कुहूसोबत पुन्हा एकत्र येते.

4. शुभ मंगल ज्यादा सावधान

शुभ मंगल ज्यादा सावधान

अभिनेता आयुष्मान खुराना, जितेंद्र कुमार, गजराज राव आणि नीना गुप्ता यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट २०२० मध्ये प्रदर्शित झाला होता. चित्रपटाने समलिंगी विवाहाच्या विषयावरही प्रकाश टाकला होता. चित्रपटात, अमनचे कुटुंब त्यांना वेगळे ठेवण्याचा प्रयत्न करते; तरीही, कार्तिक मागे हटत नाही आणि अमनशी लग्न करण्यासाठी सर्व अडचणींशी झगडतो, अशी कथा यात होती.

5. मार्गारिटा विथ अ स्ट्रॉ

एक लडकी को देखा तो ऐसा लगा

'मार्गारिटा विथ अ स्ट्रॉ' हा चित्रपट दोन महत्त्वाच्या मुद्द्यांवर प्रकाश टाकतो, एक म्हणजे समलैंगिकता आणि अपंगत्व. या दोन्ही गोष्टी वारंवार पीडित व्यक्तींच्या जीवनात आव्हाने देत राहतात. सेरेब्रल पाल्सी असलेल्या लैलाच्या रूपात कल्की कोचलिनने अप्रतिम काम केले आहे आणि ती लेस्बियन आहे हे शोधण्यापूर्वी ती अजूनही तिच्या लैंगिकतेचा शोध घेताना दिसते. तिच्या अपंगत्वामुळे समाजात होणारा भेदभाव आणि लैंगिक प्रवृत्ती ही या चित्रपटाची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत.

हेही वाचा -

१) -Sonam Kapoor : अभिनेत्री सोनम कपूर पुन्हा एकदा रूपेरी पडद्यावर झळकणार

२) -Sonam Kapoor : अभिनेत्री सोनम कपूर पुन्हा एकदा रूपेरी पडद्यावर झळकणार

३) -R Madhavan : वाढदिवसाच्या दिवशी आर. माधवन दिसला शुटिंगमध्ये व्यग्र

ABOUT THE AUTHOR

...view details