मुंबई - अभिनेता प्रतीक गांधी याने सोशल मीडियावर रविवारी रात्री मुंबई पोलिसांसोबत आलेला 'अपमानास्पद' अनुभव शेअर केला आहे. त्याने सांगितले की ट्रॅफिक जॅममुळे तो शूटिंगच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी चालत जाऊ लागला परंतु मुंबई पोलिसांनी त्याला पकडले व त्याच्याशी कोणतीही चर्चा न करता त्याला एका गोदामात ढकलले.
स्कॅम 1992 स्टार प्रतीक गांधीने काल रात्री एक कटू अनुभव ट्विटरवर शेअर केला आहे. शुटिंगसाठी जात असताना 'व्हीआयपी' मुव्हमेंटमुळे त्याची कार ट्रॅफिकमध्ये अडकल्याने तो चलत जात होता. याबद्दल त्याने ट्विटरवर लिहिलंय, ''मुंबईतील वेस्टर्न एक्सप्रेस वे व्हिआयपी मुव्हमेंटमुळे जाम झाला होता, मी शूटिंगच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी रस्त्यांवरुन चालू लागलो आणि पोलिसांनी मला खांद्याला धरुन पकडले आणि कोणतीही चर्चा न करता वाट पाहण्यासाठी मला जवळच्या एका संगमरवरी गोदामात ढकलले. यामुळे अपमानित झाल्याचा हॅशटॅग त्याने वापरला आहे."
प्रतीकच्या ट्विटवर प्रतिक्रिया देताना, नेटिझन्सनी लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार स्वीकारण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी शहरात उपस्थिती आले असल्याचे सांगितले. एका युरने लिहिले, "पंतप्रधान आले आहेत," प्रतीक गांधी याला पंतप्रधानांच्या भेटीची माहिती नव्हती, त्याने उत्तर दिले, "अरेरे .मला माहित नव्हते." ट्रॅफिकमुळे चिडलेल्या दुसर्या युजरने लिहिले, "मग पंतप्रधान इथे असतील तर काय? आम्ही कामावर जायचे नाही का? त्यांनी जनतेला थोडी सूचना दिली असती तरी ही परिस्थिती टाळता आली असती."