मुंबई - Prabhas with new avatar : अभिनेता प्रभास स्टारर 'सालार भाग 1 सीझफायर' चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर इतिहास रचल्यानंतर तो दिग्दर्शक मारुतीच्या आगामी चित्रपटात नवीन अवतारासह प्रेक्षकांना आश्चर्यचकित करण्यासाठी सज्ज होत आहे. शुक्रवारी दिग्दर्शक मारुतीने त्याच्या X वर पोस्टरसह ही रोमांचक बातमी चाहत्यांसाठी शेअर केली.
नव्या अवतारात झळकणार अभिनेता प्रभास दिग्दर्शक मारुतीने पोस्टमध्ये लिहिलंय, "मोस्ट वेटेड रेबेलस्टार प्रभासचा नवा अवतार हा पोंगल उलगडणार आहे, या भागासाठी खूप उत्सुक आहे. प्रभासला अगदी नवीन अवतारात सादर करताना आनंद झाला आहे पीपल मीडिया फॅक्टरी अभिमानाने डायनासोरचे लॉन्चिंग करत आहे, ज्याचे रूपांतर संपूर्ण डार्लिंगमध्ये झाले आहे. पोंगल रोजी चित्रपटातील प्रभासचा फर्स्ट लुक आणि शीर्षकाचे लॉन्चिंग केले जाईल."
चाहत्यांची उत्सुकता जागवण्यासाठी प्री-लूक पोस्टर म्हणून प्रभासच्या धूसर प्रतिमेचे लॉन्चिंग करण्यात आले आहे. पोंगलच्या मुहूर्तावर ( महाराष्ट्रातील मकर संक्रांतीचा सण ) फर्स्ट लुक आणि टायटलचे अनावरण केले जाईल. टीजी विश्व प्रसाद आणि विवेक कुचिबोटला चित्रपटाची निर्मिती करत आहेत. प्रभासच्या आगामी चित्रपटाची माहिती अद्याप जाहीर झालेली नाही.
प्रभासच्या नुकत्याच रिलीज झालेल्या 'सलार: पार्ट 1-सीझफायर'ने जागतिक स्तरावर 500 कोटींचा गल्ला पार करून एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. इंस्टाग्रामवर पृथ्वीराज सुकुमारन याने गुरुवारी बॉक्स ऑफिस कलेक्शनवरील नवीन अपडेटसह पोस्टर शेअर केले. पोस्टर शेअर करताना त्याने लिहिले, "सालार भाग 1 सीझफायरने जगभरातील बॉक्स ऑफिसवर (GBOC) 500 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे."
'केजीएफ' दिग्दर्शक प्रशांत नील दिग्दर्शित 'सालार: भाग 1- सीझफायर' मध्ये प्रभास, पृथ्वीराज सुकुमारन आणि श्रुती हासन प्रमुख भूमिकेत आहेत. हा चित्रपट दिग्दर्शक प्रशांत नील आणि 'बाहुबली' स्टार प्रभास यांच्यातील पहिलाच मेगा अॅक्शन-पॅक सिनेमॅटिक चित्रपट आहे. होंबळे फिल्म्स अंतर्गत विजय किरगंदूर यांनी या चित्रपटाची निर्मिती केली होती. शाहरुख खान स्टारर 'डंकी'सोबत बॉक्स ऑफिसवर जोरदार टक्कर असूनही, प्रभास आणि पृथ्वीराज स्टारर चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली.
हेही वाचा -
- वरुण धवन 'दुल्हनिया 3'सह प्रेक्षकांच्या मनोरंजनसाठी सज्ज
- "स्वतःला वादांपासून दूर ठेवण्याचा मंत्र जपणार", करीना कपूरचा 2024 साठी दृढ निश्चय
- 'कल्की 2898 एडी' चित्रपटाचे दिग्दर्शक नाग अश्विन आयआयटी बॉम्बे टेकफेस्टसाठी सज्ज