महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Project K first glimpse : प्रभास आणि राणा दग्गुबाती 'प्रोजेक्ट के' इव्हेन्टसाठी सॅन दिएगोमध्ये दाखल - Project K first glimpse release

अमेरिकेत २० जुलै रोजी सॅन दिएगो कॉमिक कॉन येथील 'प्रोजेक्ट के'च्या प्रमोशनल इव्हेन्टसाठी सुपरस्टार प्रभास आणि अभिनेता राणा दग्गुबाती पोहोचले आहेत. या इव्हेन्टमध्ये चित्रपटाचे शीर्षक, टीझर ट्रेलर आणि चित्रपटाच्या रिलीज तारखेची घोषणा होणार आहे.

Project K first glimpse
प्रभास आणि राणा दग्गुबाती '

By

Published : Jul 18, 2023, 7:06 PM IST

मुंबई - 'प्रोजेक्ट के' चित्रपटाची पहिली झलक पाहण्यासाठी प्रभासचे तमाम चाहते उतावीळ झाले आहेत. अमेरिकेतील सॅन दिएगो कॉमिक कॉन इव्हेन्टमध्ये 'प्रोजेक्ट के'च्या प्रमोशनला सुरूवात होणार आहे. या चित्रपटाच्या शीर्षकाचा अर्थ व या सायन्स फिक्शनची पहिली झलक यात लॉन्च होणार आहे. यासाठी सुपरस्टार प्रभास आणि अभिनेता राणा दग्गुबाती सॅन दिएगोमध्ये पोहोचले आहेत.

वैजयंती मुव्हीज या बॅनरने त्यांच्या इन्स्टाग्रामवर बाहुबली स्टार प्रभास आणि राणा दग्गुबातीचे फोटो शेअर केले आहेत. त्यांनी शेअर केलेल्या या फोटोमध्ये राणा दग्गुबाती आणि प्रभास काळ्या रंगाच्या हुडीमध्ये दिसत आहेत. या फोटोत दोघे कॅमेऱ्याला पाठमोरे होऊन उभे असून दोघांच्यात काही तरी चर्चा सुरू असल्याचे दिसते.

राणा आणि प्रभासचे फोटो शेअर करत निर्मात्यांनी इन्स्टाग्रामवर लिहिलंय की, 'हे दोघे अमेरिकेत पोहोचले आहेत. २० जुलै रोजी सॅन दिएगो येथे जरुर भेटू.' 'प्रोजेक्ट के' असा हॅश टॅग देत त्यांनी पुढे लिहिलंय की, ''प्रोजेक्ट के' काय आहे?' सॅन दिएगोमध्ये प्रभाससोबत राणा दग्गुबातीही पोहोचल्यामुळे त्याच्या चाहत्यांमध्ये अस्वस्थता वाढली आहे. या चित्रपटाच्या कास्टमध्ये राणाचे नाव कधीही जाहीर करण्यात आलेले नाही. तरीही तो इव्हेन्टसाठी हजर झाल्यामुळे 'प्रोजेक्ट के'मध्ये तो देखील आहे का ही उत्सुकता चाहत्यांना लागून राहिली आहे.

'प्रोजेक्ट के'च्या टीमने सॅन दिएगो कॉॉमिक कॉन सेलेब्रिशनची सुरूवात १९ जुलै रोजी ओपनिंग नाईट पार्टीने होणार आहे. २० जुलै रोजी 'प्रोजेक्ट के'या भारताच्या मायथो साय फिक्शन एपिकच्या शीर्षकाने होणार आहे. यासाठी प्रभास, दीपिका पदुकोण आणि कमल हासन या शोचे होस्टिंग करतील. यात चित्रपटाचे संपूर्ण शीर्षकाचा अर्थ काय आहे यासह टीझर ट्रेलर आणि चित्रपटाच्या रिलीज तारखेचीही घोषणा केली जाणार आहे. 'प्रोजेक्ट के'चे कलाकार सॅन दिएगोच्या भव्य मंचावर परफॉर्मन्स करणार आहेत.

राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक नाग अश्विन यांनी बनवलेल्या 'प्रोजेक्ट के' चित्रपटात अमिताभ बच्चन आणि दिशा पटानी यांच्याही भूमिका आहेत. १२ जानेवारी २०२४ रोजी हा चित्रपट जगभरातील थिएटरमध्ये झळकणार आहे.

हेही वाचा -

१.Gadar 2 New Song : सनी देओल आणि अमिषा पटेल स्टारर 'गदर २'चे गाणे झाले प्रदर्शित...

२.Isha Ambani And Alia Bhatt : आलिया भट्टच्या कपड्यांचा ब्रँड खरेदी करणार ईशा अंबानी; जाणून घ्या किंमत..

३.Mission Impossible 7 Box Office: सहाव्या दिवशी मिशन इम्पॉसिबल ७ने भारतीय बॉक्स ऑफिसवर मारली बाजी

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details