महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

'भविष्यासाठी काउंटडाउन सुरू': प्रभासने 'कल्की 2898 एडी' रिलीजची तारीख केली जाहीर - कल्की 2898 AD काउंटडाऊन

Kalki 2898 AD countdown begins : 'कल्की 2898 AD' मध्ये प्रभासशिवाय स्टार-स्टडेड कलाकारांमध्ये कमल हासन, दीपिका पदुकोण, दुल्कर सलमान, राणा दग्गुबती, पशुपती, सस्वेता चॅटर्जी आणि दिशा पटानी यांचा समावेश आहे. या बहुभाषिक चित्रपटाचे रिलीज तेलुगु, तमिळ, हिंदी, कन्नड, मल्याळम आणि इंग्रजीमध्ये होणार आहे. 'कल्कि 2898 AD' चित्रपट पौराणिक कथा आणि भविष्यातील विज्ञान-कथा यांचे मिश्रण आहे.

Kalki 2898 AD countdown begins
कल्की 2898 एडी

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 12, 2024, 2:47 PM IST

हैदराबाद - Kalki 2898 AD countdown begins : बहुप्रतिक्षित प्रभास स्टारर 'कल्की 2898 AD' च्या रिलीजची तारीख आता निश्चित झाली आहे. 9 मे 2024 रोजी साय-फाय ड्रामा चित्रपटगृहात दाखल होणार असल्याची घोषणा प्रभासने सोशल मीडियावर केली आहे. आगामी चित्रपटाचे दिग्दर्शन राष्ट्रीय पुरस्कार विजेता दिग्दर्शक नाग अश्विन यांनी केले आहे.

प्रभासने त्याच्या इंस्टाग्रामवर आकर्षक पोस्टरसह पोस्ट शेअर करत "भविष्याची उलटी गिनती सुरू झाली आहे! 'कल्की 2898 AD' जगभरातील थिएटरमध्ये 9 मे 2024 रोजी," असे लिहिलंय. आधी हा चित्रपट संक्रांतीला रिलीज होणार होता.

चित्रपटाबाबतची उत्कंठा वाढलेली असताना 'कल्की 2898 AD' ने कॅरेक्टर पोस्टर रिलीज करून आणि 2023 मध्ये सॅन दिएगोच्या कॉमिक-कॉनमध्ये एक झलक दाखवून चित्रपटाबद्दलची सकारात्मक चर्चा निर्माण केली होती. 2024 मधील सर्वाधिक बजेट असलेला चित्रपट अशी याची ओळख निर्माण झाली आहे. या चित्रपटाचे बजेट 600 कोटी असल्याचं म्हटलं जातं.

'कल्की 2898 AD' मध्ये प्रभासशिवाय स्टार-स्टडेड कलाकारांमध्ये कमल हासन, दीपिका पदुकोण, दुल्कर सलमान, राणा दग्गुबती, पशुपती, सस्वेता चॅटर्जी आणि दिशा पटानी यांचा समावेश आहे. या बहुभाषिक चित्रपटाचे रिलीज तेलुगु, तमिळ, हिंदी, कन्नड, मल्याळम आणि इंग्रजीमध्ये होणार आहे. कल्कि 2898 AD चित्रपट पौराणिक कथा आणि भविष्यातील विज्ञान-कथा यांचे मिश्रण आहे.

'कल्की 2898 AD' चित्रपटाची घोषणा झाल्यापासून याबद्दलची प्रेक्षकांची उत्सुकता ताणली आहे. चित्रपटाची झलक दिसल्यानंतर त्याच्यातील भव्यता डोळ्या न मावणारी वाटत होती. आधुनिक उत्तम ग्राफिक्स तंत्राचा वापर यामध्ये झाल्याचं दिसतं. अमिताभ आणि कमल हासनसारखे दिग्गज स्टार यामध्ये आहेत हेदेखील एक मोठे आकर्षण साऊथ आणि हिंदी चित्रपट प्रमींमध्ये असू शकते. प्रभास आणि दीपिका पदुकोण पहिल्यांदाच या चित्रपटातून एकत्र येत आहेत.

9 मे च्या आसपास कोणतेही मोठे रिलीज शेड्यूल झालेली नसले तरी उद्योगपती श्रीकांत बोल्ला यांच्या बायोपिकवर आधारित 'श्री' हा चित्रपट या दरम्यान रिलीज होणार आहे.

हेही वाचा -

  1. धनुष स्टारर 'कॅप्टन मिलर' मोठ्या पडद्यावर धूमधडाक्यात प्रदर्शित
  2. 'अन्नपूर्णी'तील वादग्रस्त सीन प्रकरणी अभिनेत्री नयनतारासह आठ जणांविरुद्ध ठाणे जिल्ह्यात गुन्हा दाखल
  3. 'इंडियन पोलीस फोर्स'चा अनुभव सांगताना विवेक ओबेरॉय म्हणाला, "रोहित शेट्टी फिल्म इंडस्ट्रीचा विक्रम बक्षी"

ABOUT THE AUTHOR

...view details