महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Mega budget film project k : 'प्रोजेक्ट के'साठी प्रभास, कमल हसनला किती कोटी रुपये मिळाले? आकडा वाचून बसेल धक्का - प्रभासला १५० कोटी रुपये दिले जाणार

नाग अश्विनचा आगामी चित्रपट 'प्रोजेक्ट के' हा मेगा बजेट चित्रपट असणार आहे,या चित्रपटात काम करणाऱ्या कलाकारांना भरघोस मानधन दिले जाणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, 'प्रोजेक्ट के'साठी प्रभासला १५० कोटी रुपये, कमल हसनला २५ कोटी रुपये आणि दीपिकाला १० कोटी रुपये दिले जाणार आहेत.

Mega budget film project k
मेगा बजेट चित्रपट प्रोजेक्ट के

By

Published : Jun 27, 2023, 12:15 PM IST

मुंबई : दिग्दर्शक नाग अश्विन त्याचा आगामी सायन्स फिक्शन अ‍ॅक्शन चित्रपट मेगाबजेटमध्ये बनवणार आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, 'प्रोजेक्ट के' चे बजेट ६०० कोटी रुपये आहे आणि २०० कोटी रुपये फक्त कलाकारांच्या फीवर खर्च केले जात आहेत. नाग अश्विनचा हा मेगाबजेट आणि मेगास्टारर चित्रपट दोन भागात प्रदर्शित होणार आहे. 'प्रोजेक्ट के' १२ जानेवारी २०२४ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट दोन भागात प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे या दोन्ही भागाची शूटिंग निर्माते एकत्र करणार असल्याचे समजत आहे. चित्रपटाचे ८० टक्के काम पूर्ण झाले आहे.

प्रोजेक्ट के : प्रभासचा नुकताच प्रदर्शित झालेला 'आदिपुरुष' बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई करू शकला नाही, पण तरीही इतर निर्माते त्यांच्यावर करोडो रुपये खर्च करायला मागेपुढे पाहत नाहीत. प्रभासकडे आणखी काही बिग बजेट चित्रपट आहेत आणि त्यापैकी एक म्हणजे दिग्दर्शक नाग अश्विनचा 'प्रोजेक्ट के' आहे. 'प्रोजेक्ट के'च्या स्टार कास्टमध्ये आधीच प्रभास, दीपिका पदुकोण, दिशा पटानी आणि अमिताभ बच्चन यांचा समावेश होता आणि आता कमल हासन यांनाही साइन करण्यात आले आहे. यामुळे चित्रपटाचे बजेट वाढण्याची शक्यता आहे.

चित्रपटाचे बजेट ६०० कोटी : मीडिया रिपोर्ट्सनुसार, 'प्रोजेक्ट के'चे बजेट आता ६०० कोटी रुपयांवर गेले आहे. ६०० कोटी रुपयांचे बजेट थक्क करणारे आहे, काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, प्रभासने या चित्रपटासाठी तब्बल १५० कोटी रुपये फी घेतली आहे. दरम्यान, चित्रपटातील इतर, स्टार्सला म्हणजेच अमिताभ बच्चन आणि दीपिका पदुकोण यांना १०-१० कोटी रुपये मानधन दिले जाईल. तर कमल हसनला काही दिवसांच्या शूटिंगसाठी २५ कोटी रुपये मानधन दिले जाणार आहे. या चित्रपट निर्मात्यांनी याबाबत अधिकृतरित्या काही सांगितले नाही आहे. या चित्रपटाला संगीत संतोष नारायणन यांनी दिले आहे.

रामोजी फिल्म सिटीमध्ये बांधला सेट :वैजयंती मुव्हीजच्या ५०व्या वर्धापन दिनानिमित्त फेब्रुवारी २०२० मध्ये या चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती. मात्र, कोविड-१९ महामारीमुळे या चित्रपटासाठी उशीर झाला. जुलै २०२१ मध्ये हैदराबादमधील रामोजी फिल्म सिटीमध्ये बांधलेल्या भविष्यकालीन सेटमध्ये शुटिंगला सुरुवात झाली आहे.

हेही वाचा :

  1. Allu Sirish : अल्लू सिरिशने बॉलिवूड अभिनेता आमिर खानसोबतचा एक फोटो इन्स्टाग्रामवर केला शेअर
  2. Arjun kapoor birthday : अर्जुन कपूरला वाढदिवसानिमित्याने गर्लफ्रेंन्ड मलायका अरोराने दिल्या शुभेच्छा...
  3. Aerial action film Fighter : हृतिक रोशनच्या एरियल अ‍ॅक्शन चित्रपट 'फायटर'ने केला इंटरनेटवर धमाका

ABOUT THE AUTHOR

...view details