मुंबईअभिनेत्री शिवानी सुर्वेची मुख्य भुमिका असणाऱ्या आफ्टर ऑपरेशन लंडन कॅफे After Operation London Cafe चित्रपटाच पोस्टर लाँच करण्यात आलं आहे. शिवानी सुर्वेच्या Shivani Surve वाढदिवशीचं दीपक राणे फिल्म्सच्या Dipak Rane Films आफ्टर ऑपरेशन लंडन कॅफेचे तिसरे पोस्टर अनावरीत करण्यात आले आहे. त्यात शिवानी सुर्वेचा डॅशिंग लूक प्रेक्षकांसमोर आला आहे. दीपक राणे फिल्म्स आणि इंडियन फिल्म फॅक्ट्रीचा indian film factory आफ्टर ऑपरेशन लंडन कॅफे हा एक ऍक्शन, रोमँटिक सिनेमा आहे. यातल्या प्रत्येक कलाकाराच्या आत्तापर्यंतच्या लूकवरुन मराठी सिनेमात हा एक वेगळा प्रयोग ठरणार आहे असं म्हणता येईल. युनिफॉर्म, हातात बंदूक आणि डोळ्यात राग असा शिवानीचा लूक नक्कीच चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढविणारा आहे.
काय म्हणाली शिवानी सूर्वेमराठी, हिंदी मालिका आणि चित्रपटांमध्ये नानाविध भूमिका केल्यानंतर शिवानीचा हा लूक थक्क करणारा आहे. गोरा रंग, गोंडस चेहरा असलेल्या शिवानीला सर्वांनी आतापर्यंत सुंदर नायिकेच्या रुपात पाहिले आहे. आता या चित्रपटात तिचा डी ग्लॅम लूक आहे. तिच्या या लूकबद्दल आणि या सिनेमातल्या भूमिकेबद्दल लवकरच उलगडा होणार आहे. शिवानी तिच्या या लूकबद्दल म्हणाली, की आफ्टर ऑपरेशन लंडन कॅफे After Operation London Cafe हा माझ्यासाठी खूप महत्वाचा सिनेमा आहे. आम्हाला हा लूक करताना खूप मजा आली. खरंतर स्वतःला या गणवेशात पाहणं सुरुवातीला वेगळं वाटत होतं आणि याची सवय होण्यासाठी मला एक दिवस गेला. माझ्यासाठी हा निर्णय धाडसी होता. आपल्याकडे साधारणपणे नायिकेला सुंदर दाखवण्यासाठी प्रयत्न केले जातात. पण या भूमिकेची गरज अशी होती की, आम्हाला या सगळ्या गोष्टीचा विचार न करता, हा लूक ठरवावा लागला होता. एखाद्या कलाकाराला खूप वर्षे लागतात चांगली भूमिका मिळवण्यासाठी आणि मी म्हणेन की माझ्यासाठी हा बेस्टेस्ट रोल आहे. मी या भूमिकेसाठी खूप मेहनत घेतली आहे. या भूमिकेच्या मुळापाशी जाऊन मी काम केलं आहे. त्यामुळे प्रेक्षकांसमोर हा लूक घेऊन येताना खूप आनंद होतो आहे.