मुंबई चित्रपटसृष्टीतून पुन्हा एकदा वाईट बातमी आली आहे. चित्रपट समीक्षक कौशिक एलएम यांचे सोमवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. कौशिक हे प्रसिद्ध मनोरंजन ट्रॅकर यूट्यूब व्हिडिओ जॉकी आणि चित्रपट समीक्षक होते. वयाच्या ३५ व्या वर्षी त्यांच्या निधनामुळे चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनाबद्दल साऊथ सेलिब्रिटींनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शोक व्यक्त केला आहे.
दाक्षिणात्य अभिनेत्री कीर्ती सुरेशने ट्विटरवर कौशिक यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आणि लिहिले की ही बातमी ऐकल्यानंतर माझ्याकडे शब्द नाहीत. ही केवळ अविश्वसनीय आहे. माझे हृदय त्यांच्या कुटुंबीय आणि मित्रांसोबत आहे. सर्वांप्रती मनापासून शोक व्यक्त करतो. तू आता नाहीस यावर विश्वासच बसत नाही.
चित्रपट निर्माते व्यंकट प्रभू यांनी कौशिक एलएम यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आणि लिहिले, ओएमजी विश्वासच बसत नाही काही दिवसांपूर्वी त्याच्याशी बोललो आयुष्याचा खरच भरोसा नाही हे योग्य नाही कौशिकच्या कुटुंबियांना आणि मित्रांबद्दल मनापासून शोक खूपच लवकर गेलास माझ्या मित्रा.