महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Pooja Hegde shares Love on a plate : पूजा हेगडेच्या ताटात आईनं वाढलं प्रेम, साजरा झाला खास दिवस

Pooja Hegde shares Love on a plate : अभिनेत्री पूजा हेगडेनं दसऱ्याच्या निमित्तानं खास पोस्ट शेअर केलीय. आईनं बनवलेल्या स्वादिष्ठ दक्षिण भारतीय पद्धतीच्या पारंपरिक जेवणाने तृप्त झाल्याचं व दिवस खास बनल्याचं तिनं म्हटलंय.

Pooja Hegde shares Love on a plate
पूजा हेगडेचा खास दिवस साजरा

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 25, 2023, 12:58 PM IST

मुंबई - Pooja Hegde shares Love on a plate : दसरा सण अतिशय उत्साही वातावरणात भारतभर साजरा झाला. अनेक सिलेब्रिटींनी पारंपरिक वस्त्रे परिधान करुन या मोठ्या सणाचा आनंद घेतला. हा दिवस अभिनेत्री पूजा हेगडेसाठी खास होता. या दिवसाचा आवडता भाग शेअर करण्यासाठी तिनं सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला आहे. दसरा सणाच्या निमित्तान त्यांच्या घरी स्वादिष्ट दक्षिण भारतीय रेलचेल पाहायला मिळाली. केळीच्या पानावर अनेक खाद्य पदार्थ मांडलेला एक आकर्षक फोटो तिनं इन्स्टाग्राम स्टोरीजवर शेअर केला. याच्या कॅप्शनमध्ये तिनं लिहिलं, 'माझ्या दिवसात सर्वात खास भाग. शेफ आई = जगातील सर्वोत्तम शेफ.' पुढच्या एका फोटोत ती जेवणासोबत पोज देताना दिसतेय. याच्या कॅप्शनमध्ये तिनं पानावर ( प्लेटवर ) प्रेम असल्याचं लिहिलंय.

पूजा हेगडेच्या कामाच्या आघाडीचा विचार करायचा तर ती दिग्दर्शक रोशन एंड्र्यूजच्या आगामी 'देवा' चित्रपटामध्ये शाहिद कपूरसोबत काम करण्यासाठी सज्ज झाली आहे. दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर, अभिनेता शाहिद कपूरनं त्याच्याआगामी शीर्षकाची घोषणा केली आणि फर्स्ट लुक पोस्टरही शेअर केलं. इंस्टाग्राम शाहिदनं त्याच्या आगामी चित्रपटाच्या पहिल्या लूकनं चाहत्यांना ट्रीट केलं. रोशन एंड्र्यूज यांनी यापूर्वी 'सॅल्यूट' आणि 'कायमकुलम कोचुन्नी' सारख्या मल्याळम चित्रपटाचं दिग्दर्शन केलंय. 'देवा' या चित्रपटातून ते आता हिंदी फिल्म इंडस्ट्रीमध्ये आपली कारकिर्द फुलवण्याचा प्रयत्न करत आहे. या चित्रपटाची निर्मिती सिद्धार्थ रॉय कपूर आणि झी स्टुडिओज करत आहेत.

प्रॉडक्शन हाऊस रॉय कपूर फिल्म्सने अलिकडेच इन्स्टग्रामवर एक पोस्ट शेअर केली ज्यामध्ये पूजा हेगडे अभिनेता शाहिद कपूर, दिग्दर्शक रोशन अँड्र्यूज आणि निर्माता सिद्धार्थ रॉय कपूर यांच्यासोबत पोज देताना दिसत होती. आमच्या रोमांचकारी प्रवासात साहसी मुलगी पूजा हेगडेही समहभागी झालीय. आमच्या या सुंदर लिडींग लेडीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

पूजा हेगडेनं देवा चित्रपटाच्या कलाकारांमध्ये सामील होण्याबद्दलची तिची उत्सुकता शेअर केली आणि म्हणाली, 'इतक्या उत्कंठावर्धक पण वेगळी कथानक असलेला हा एक अतिशय खास चित्रपट आहे. रोशन एंड्र्यूज मोठ्या पडद्यावर जादू निर्माण करण्यासाठी ओळखला जातो. आता मी हा प्रवास सुरू करण्यासाठी जास्त प्रतीक्षा करू शकत नाही. प्रेक्षक मला अनोख्या आणि वेगळ्या भूमिकेत पाहतील. मी शाहिद कपूरसोबत काम करण्यासाठी उत्सुक झालीय. तो एक उत्कृष्ट कलाकार आहे आणि मला आशा आहे की आमची उत्तम केमेस्ट्री जमून येईल.'

ABOUT THE AUTHOR

...view details