महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

'पोन्नियिन सेल्वन'चा टीझर रिलीज, 'राणी'च्या भूमिकेत झळकली ऐश्वर्या राय बच्चन - Aishwarya in the role of Queen

'पोन्नियिन सेल्वन पार्ट वन' या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे. टीझरमध्ये ऐश्वर्या राय बच्चन आणि त्रिशा सुंदर दिसत आहेत. चित्रपटाची कथा चोल साम्राज्यावर आधारित आहे. हा टीझर शेवटपर्यंत प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा आहे.

'पोन्नियिन सेल्वन'चा टीझर रिलीज
'पोन्नियिन सेल्वन'चा टीझर रिलीज

By

Published : Jul 9, 2022, 12:22 PM IST

हैदराबाद: दक्षिण चित्रपटसृष्टीतील दिग्गज चित्रपट दिग्दर्शक मणिरत्नम यांच्या बहुप्रतिक्षित चित्रपट 'पोन्नियिन सेल्वन पार्ट-1'चा टीझर रिलीज झाला आहे. यापूर्वी बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनसह सर्व पात्रांचे नवीन लूक पोस्टर्स समोर आले होते.

1.21 च्या टीझरमध्ये दिग्दर्शक मणिरत्नम यांनी चित्रपटातील प्रत्येक पात्र अतिशय सुंदरपणे मांडली आहेत. विक्रम, जयम रवी, त्रिशा, कार्ती आणि ऐश्वर्या राय आपापल्या लूकमध्ये छान दिसत आहेत. चित्रपटाची कथा चोल साम्राज्यावर आधारित आहे. हा टीझर शेवटपर्यंत प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा आहे.

'पोनियान सेल्वन पार्ट-1' चित्रपटाच्या निर्मात्यांनी बुधवारी (6 जुलै) चित्रपटातील ऐश्वर्या रायचे नवीन पोस्टर रिलीज केले होते. या पोस्टरमुळे ऐश्वर्याच्या व्यक्तिरेखेवरूनही पडदा उठला आहे. या चित्रपटात ऐश्वर्या राणी नंदनीची भूमिका साकारणार आहे. पोस्टरमधील ऐश्वर्याच्या लूकबद्दल सांगायचे तर ती सुंदर साडी आणि लांब केसांमध्ये दिसली होती.

निर्मात्यांनी चित्रपटातील ऐश्वर्या रायचे पोस्टर शेअर केले आणि लिहिले, 'सूड घेण्याचा एक सुंदर चेहरा असतो, पझ्वूरची राणी नंदिनीला भेटा'. हा चित्रपट तामिळ, हिंदी, तेलगू, मल्याळम आणि कन्नड भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

साऊथ सुपरस्टार विक्रम, जयम रवी, कार्ती त्रिशा, सरथ कुमार, प्रकाश राज, शोभिता धुलिपाला, विक्रम प्रभू आणि ऐश्वर्या राय बच्चन 'पोन्नियन सेल्वन पार्ट-1' चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत आहेत. हैदराबाद आणि मध्य प्रदेशसह देशभरातील विविध शहरांमध्ये या चित्रपटाचे चित्रीकरण झाले आहे. मणिरत्नम अनेक दिवसांपासून या चित्रपटाची तयारी करत आहेत. हा चित्रपट ३० सप्टेंबर रोजी जगभरात प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा -अक्षय कुमारच्या अनटाइटल्ड चित्रपटाचा फर्स्ट लूक लीक

ABOUT THE AUTHOR

...view details