महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

नोरा फतेहीवर 200 कोटी खंडणी प्रकरणी पोलीसांनी केला 50 हून अधिक प्रश्नांचा भडिमार - नोरा फतेहीची पोलीस चौकशी

दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने अभिनेत्री नोरा फतेहीची शुक्रवारी दिल्लीतील कार्यालयात 200 कोटी रुपयांच्या खंडणीच्या प्रकरणात आरोपी सुकेश चंद्रशेखर याच्याशी असलेल्या संबंधाबाबत नऊ तास चौकशी केली. चौकशीदरम्यान नोराला सुकेश चंद्रशेखर आणि त्याच्याकडून मिळालेल्या भेटवस्तूंशी संबंधित सुमारे 50 प्रश्न विचारण्यात आले.

नोरा फतेही
नोरा फतेही

By

Published : Sep 3, 2022, 1:34 PM IST

Updated : Sep 3, 2022, 1:44 PM IST

नवी दिल्ली- दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने Economic Offences Wing (EoW) अभिनेत्री नोरा फतेहीची actress Nora Fatehi शुक्रवारी दिल्लीतील कार्यालयात 200 कोटी रुपयांच्या खंडणीच्या प्रकरणात आरोपी सुकेश चंद्रशेखर Sukesh Chandrashekhar याच्याशी असलेल्या संबंधाबाबत नऊ तास चौकशी केली. चौकशीदरम्यान नोराला सुकेश चंद्रशेखर आणि त्याच्याकडून मिळालेल्या भेटवस्तूंशी संबंधित सुमारे 50 प्रश्न विचारण्यात आले.

पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, 2 सप्टेंबरला बोलावण्यात आलेली नोरा फतेही सकाळी 11 च्या सुमारास मंदिर मार्गावरील EOW कार्यालयात हजर झाली होती. तिच्यासोबत तिचे वकीलही होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री 8 वाजेपर्यंत अभिनेत्रीची चौकशी करण्यात आली, त्यानंतर ती निघून गेली. तिला पुन्हा चौकशीसाठी बोलावले जाऊ शकते, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.

"ती नुकतीच दुबईहून परतली. तिला सुकेश चंद्रशेखर याच्याकडून मिळालेल्या भेटवस्तूंशी संबंधित प्रश्न विचारण्यात आले. या कालावधीत ती कोणाशी फोनवर बोलली होती किंवा कोणाशी संपर्क साधला हे देखील तिला विचारण्यात आले," असे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. पोलिस अधिका-यांनी सांगितले की आतापर्यंतच्या चौकशीतून असे समोर आले आहे की नोरा आणि जॅकलीन फर्नांडिस यांचे सुकेश चंद्रशेखरशी देखील संबंध आहेत, दोघींनाही भेटवस्तू मिळाल्याबद्दलची माहिती आहे.

चंद्रशेखरची पत्नी लीना मारिया पॉल हिने नोराशी संपर्क साधला होता. नंतर घोटाळ्यातील तिच्या भूमिकेसाठी अटक करण्यात आली होती. "तिने नेल आर्ट फंक्शनसाठी मॅनेजरमार्फत नोराशी संपर्क साधला होता आणि नंतर दोघेही जवळ आले आणि चंद्रशेखरने नोराला बीएमडब्ल्यू कार, महागडे फोन आणि इतर भेटवस्तू भेट दिल्या. नोराने असेही स्पष्ट केले आहे की चंद्रशेखर तुरुंगात आहे किंवा भेटवस्तू याबद्दल तिला माहीत नव्हते. या वस्तु गुन्ह्याच्या पैशातून विकत घेतले जात आहेत याचीही तिला कल्पना नव्हती. तिने असेही सांगितले की तिने तुरुंगात चंद्रशेखरला भेट दिली नाही," असे अधिकारी म्हणाले.

यापूर्वी, अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) 13 सप्टेंबर आणि 14 ऑक्टोबर 2021 रोजी नोरा फतेहीचे स्टेटमेंट देखील रेकॉर्ड केले होते. यात तिने कथित कॉनमन आणि त्याची अभिनेत्री पत्नी लीना यांच्याकडून भेटवस्तू मिळाल्याची कबुली दिली होती. दिल्ली पोलिसांनी नोंदवलेल्या एफआयआरवर ईडीने कथित घोटाळ्यात मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला होता.

नोरा व्यतिरिक्त, अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसचे नाव देखील या घोटाळ्यात समोर आले आहे. तिचे ईडीने आरोपी म्हणून नाव नोंदवले आहे. दरम्यान, ईडीने यापूर्वी सांगितले होते की जॅकलिन फर्नांडिसचे 30 ऑगस्ट आणि 20 ऑक्टोबर 2021 रोजी जबाब नोंदवण्यात आले होते, जिथे तिने चंद्रशेखर यांच्याकडून भेटवस्तू मिळाल्याचे कबूल केले होते.

बॉलीवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस विरुद्ध ईडीने दाखल केलेल्या आरोपपत्रात स्पष्टपणे म्हटले आहे की, 'तिने जाणीवपूर्वक त्याच्या (सुकेश चंद्रशेखर) गुन्हेगारी भूतकाळाकडे दुर्लक्ष केले आणि त्याच्याशी आर्थिक व्यवहार करत राहिली. केवळ तिलाच नाही तर तिच्या कुटुंबातील सदस्यांना आणि मित्रांनाही या नात्याचा आर्थिक फायदा झाला आहे.

ईडीने असेही निष्कर्ष काढले की पैशाच्या आमिषामुळे ती ज्या व्यक्तीशी गुंतलेली होती त्याच्या गुन्हेगारी इतिहासाचा तिला काही फरक पडत नाही. ईडीने असेही म्हटले आहे की फर्नांडीझने गुन्ह्यातून मिळालेली रक्कम आणि मौल्यवान भेटवस्तूंचा वापर स्वत:साठी आणि तिच्या कुटुंबातील सदस्यांसाठी भारतात तसेच परदेशात केला होता आणि हे मनी लाँडरिंग प्रतिबंध कायदा 2002 च्या कलम 3 अंतर्गत मनी लाँडरिंग अंतर्गत गुन्हा आहे.

सुकेश चंद्रशेखर हा मूळचा कर्नाटकातील बेंगळुरूचा रहिवासी असून तो सध्या दिल्लीच्या तुरुंगात बंद असून त्याच्यावर १० हून अधिक गुन्हे दाखल आहेत. रॅनबॅक्सीचे माजी मालक शिविंदर सिंग यांची पत्नी आदिती सिंग यांनी रोहिणी तुरुंगात असताना 200 कोटी रुपयांचे खंडणी रॅकेट चालवल्याचा आरोप चंद्रशेखरवर आहे.

हेही वाचा -मराठी रंगभूमीशी संबंधित असल्याचा उर्मिला मातोंडकरला अभिमान

Last Updated : Sep 3, 2022, 1:44 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details