मुंबई - PM Narendra Modi turns lyricist : संगीतकार तनिष्क बागची आणि गायिका ध्वनी भानुशाली यांच्या गर्बो नावाच्या नवीन नवरात्री गाण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी गीतकार बनले आहेत. पीएम मोदींच्या या आश्चर्यकारक प्रतिभेचं प्रसिद्ध अभिनेत्री कंगना रणौतसह अनेकांकडून कौतुक करण्यात आलंय.
ध्वनी भानुशालीनं ट्विटरवर ही बातमी शेअर करत तिनं तनिष्क बागचीच्या वतीनं नरेंद्र मोदी यांचं गीत लिहिल्याबद्दल आभार व्यक्त केलं. तिन लिहिलं, 'प्रिय नरेंद्र मोदी जी, तनिष्क बागची आणि मला तुमच्याद्वारे लिहिलेला गरबा खूप आवडला आणि आम्हाला नवीन लय, रचना आणि चव असलेले गाणं बनवायचं होतं. जस्ट म्यूझिकनं आम्हाला हे गाणं आणि व्हिडिओ जिवंत करण्यात मदत केली.'
या पोस्टला पीएम मोदीं प्रत्युत्तर दिलं असून त्यांनी ध्वनी भानुशाली आणि जस्ट म्यूझिकच्या टीमचं त्यांच्या गरबा गीतांच्या सादरीकरणाबद्दल आभार मानलं आहेत. त्यांनी भूतकाळातील आठवणी जागवल्या आणि सांगितलं की त्यांनी बर्याच वर्षांत लिहिलं नव्हतं, परंतु त्यांनी एक नवीन गरबा गीत रचलं होतं आणि हे गीत नवरात्रीच्या वेळी शेअर करण्याचा त्यांचा हेतू होता.
गर्बो हे गाणे नवरात्रीच्या दरम्यान गुजरातच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचा उत्सव म्हणून सादर झालं आहे. या गाण्यासाठी गायिका ध्वनी भानुशाली यांनी स्वरसाज चढवला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गीताला तनिष्क बागची यांनी संगीतबद्ध केलं आहे.
कंगना रणौतनेही पंतप्रधान मोदींच्या गाण्याला प्रेरणादायी असल्याचे सांगून या गाण्याचे कौतुक केलं. तिने ट्विट केले, 'किती सुंदर आहे, मग ती अटलजींच्या कविता असोत किंवा नरेंद्र मोदीजींची गाणी/कविता आणि कथाकथन, आमच्या कणखर नायकांना कलेचे सौंदर्य आणि कोमलता यात रमताना पाहणं नेहमीच हृदयस्पर्शी आहे. नवरात्री 2023 गरबा. सर्व कलाकारांसाठी खूप प्रेरणादायी आहे.'