महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Happy Birthday PM Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 'या' बॉलिवूड सेलिब्रिटींनी दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा... - Akshay Kumar PM Modi birthday wishes

Happy Birthday PM Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 17 सप्टेंबर रोजी (आज) वाढदिवस आहे. यानिमित्त बॉलिवूड सेलिब्रिटींनीही त्यांना शुभेच्छा देत त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

Etv Bharat
Etv Bharat

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 17, 2023, 3:16 PM IST

मुंबई - Happy Birthday PM Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज त्यांचा 73 वा वाढदिवस साजरा करत आहेत. या खास प्रसंगी देशभरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. चित्रपटसृष्टीतील कलाकारांन देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून पंतप्रधान मोदी यांना शुभेच्छा दिल्या आहेत. अनुपम खेर, स्मृती इराणी, कंगना राणौत, टायगर श्रॉफ, रितेश देशमुख , अक्षय कुमार, राजकुमार राव, मनोज मुनताशीर, राकेश रोशन, सलमान खान, किरण खेर, अक्षय कुमार आणि पवन सिंह यांनी पंतप्रधान मोदी यांच्यासाठी खास पोस्ट शेअर करून शुभेच्छांचा वर्षाव केलाय.

किरण अनुपम खेर यांनी पंतप्रधानांना दिल्या शुभेच्छा :अनुपम खेर यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे काही खास फोटो शेअर केले आहेत. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहलं, 'आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी. तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, देव तुम्हाला दीर्घायुष्य आणि निरोगी आयुष्य देवो. पुढील अनेक वर्षे तुम्ही असेच समर्पण आणि कठोर परिश्रम घेऊन आमच्या भारताचं नेतृत्व करत राहो. गेल्या 9 वर्षात तुम्ही देशाला जे स्थान मिळवून दिलं, त्यामुळं जगाच्या कानाकोपऱ्यात अनेक भारतीयांना अभिमान वाटतो. तुमची राहणीमान खूप प्रेरणादायी आहे. त्यानंतर पंतप्रधानांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना किरण खेर यांनी लिहिलं, 'भारताला जगाच्या नकाशावर आणणारे आमचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा. आपल्या देशाच्या आणि लोकांच्या कल्याणासाठी तुमचं समर्पण अत्यंत प्रशंसनीय आहे. तुम्हाला आरोग्य आणि गौरवशाली वर्षांच्या शुभेच्छा.

कंगना रणौत दिल्या शुभेच्छा :बॉलिवूडची क्वीन कंगना रणौतनं तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर पीएम मोदींचा फोटो पोस्ट करत लिहलं, 'जगातील सर्वात प्रेमळ नेत्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा. ज्यांनी आपल्या कठोर परिश्रमानं आणि दृढनिश्चयानं सक्षमीकरणाच्या शिखरांना स्पर्श केला. नव्या भारताचे ते शिल्पकार बनले. भारतातील जनतेसाठी तुम्ही केवळ पंतप्रधान नसून, प्रभू रामाप्रमाणं तुमचं नावही राष्ट्राच्या अंतरात्म्यामध्ये कोरले आहे. मी तुम्हाला दीर्घ आणि निरोगी आयुष्यासाठी शुभेच्छा देते.

सलमान खान आणि अक्षय कुमारनंही दिल्या शुभेच्छा : सलमान खाननं आपल्या सोशल मीडियावर एक पोस्ट करत लिहिलं, 'माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजींना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. त्यानंतर अक्षय कुमारनं एक्सवर पंतप्रधानांसोबतचा एक फोटो शेअर करत लिहिलं, 'वाढदिवसाच्या शुभेच्छा नरेंद्र मोदीजी. वर्षानुवर्षे आम्हाला प्रेरणा देत राहा. तुमच्या उत्तम आरोग्यसाठी मी प्रार्थना करतो आणि सदैव आनंदासाठी शुभेच्छा. तसेच 'पंतप्रधानांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना राजकुमार रावनं लिहिलं, 'प्रिय नरेंद्र मोदीजी तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि जी20 च्या प्रचंड यशाबद्दल खूप खूप अभिनंदन. देव तुम्हाला दीर्घायुष्य आणि सर्व सुख देवो. असेच तुम्ही आम्हा सर्वांना प्रेरणा देत रहा. जय हिंद. या खास दिवशी अनेकजण पंतप्रधान मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत.

हेही वाचा :

  1. Siima 2023 Full Winners List: दक्षिण भारतीय आंतरराष्ट्रीय पुरस्कार झाला दुबईत संपन्न...
  2. Salman khan : सलमान खाननं भाची अलीजेह अग्निहोत्रीसाठी लिहिली खास पोस्ट; वाचा...
  3. Happy Birthday Nick Jonas: प्रियांका चोप्रानं पती निक जोनासला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत खास पोस्ट केली शेअर...

ABOUT THE AUTHOR

...view details