मुंबई- फ्रान्समधील 75 व्या कान्स चित्रपट महोत्सव 2022 मध्ये भारतीय शिष्टमंडळ आणि कलाकारांनी आपली उपस्थिती दर्शवली. भारत या महोत्सवात 'कंट्री ऑफ ऑनर' म्हणून सहभागी झाला आहे. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताचा 'कंट्री ऑफ ऑनर' म्हणून समावेश झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे.
देश स्वातंत्र्याची ७५ वर्षे साजरी करत असताना भारत ‘कंट्री ऑफ ऑनर’ म्हणून कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी होत आहे, असे पंतप्रधान मोदींनी एका संदेशाद्वारे सांगितले. एकीकडे भारत आणि फ्रान्स यांच्या राजनैतिक संबंधांना ७५ वर्षे पूर्ण होत आहेत तर दुसरीकडे कान्स फिल्म फेस्टिव्हल ७५ वा वर्धापन दिन साजरा करत आहे.
भारतात कथांची कमतरता नाही: पंतप्रधान मोदी - आपल्या संदेशात पीएम मोदींनी भारताचे वर्णन जगाचे फिल्म हब म्हणून केले आहे, जिथे चित्रपट क्षेत्रात अनेक विविधता आहेत. पीएम मोदींनी लिहिलं आहे की, भारताकडे अनेक कथांचे भांडार आहे. आपल्या देशात आशयाच्या दृष्टीने अनेक शक्यता आहेत.