मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. अमेरिकेच्या व्हाईट हाऊसमध्ये येथे एका स्टेट डिनरचे आयोजन करण्यात आले होते. यादरम्यान पंतप्रधान मोदींनी अमेरिकन संसदेलाही संबोधित केले. आपल्या भाषणात पीएम मोदींनी दोन्ही देशांमधील संबंध यावर भाष्य करत असताना एका खास चित्रपटाचा उल्लेख केला. येथे पंतप्रधानांनी दाक्षिणात्य चित्रपट उद्योगातील दिग्गज दिग्दर्शक एसएस राजामौली यांच्या आरआरआर या सुपरहिट चित्रपटातील 'नाटू-नाटू' आणि स्पायडरमॅन या ऑस्कर विजेत्या गाण्याचा उल्लेख केला.
अमेरिकन मुलं नाटू नाटूवर नाचतात - विशेष म्हणजे, स्टेट डिनरपूर्वी पंतप्रधान मोदींनी अमेरिकन संसदेला संबोधित केले. आपल्या भाषणात पीएम मोदी असे म्हणताना दिसले की भारतातील मुले हॅलोविनवर कोळी बनण्याचा आनंद घेतात, तर अमेरिकेतील मुले ऑस्कर विजेत्या नाटू नाटू गाण्यावर नाचतात. आता अमेरिकन संसदेत पीएम मोदींच्या नाटू नाटू या गाण्याचा उल्लेख सोशल मीडियावर चांगलाच गाजत आहे.
नाटू नाटू गाण्याला ऑस्कर पुरस्काराने सन्मानित - २०२३ मध्ये पार पडलेल्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात एसएस राजामोली दिग्दर्शित आरआरआर चित्रपटातील नाटू नाटू गाण्याला सर्वोत्कृष्ट गाण्याच्या श्रेणीत ऑस्कर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. यासाठी चित्रपटाची संपूर्ण टीम ऑस्कर सोङळ्यात हजर होती. या कार्यक्रमात नाटू नाटू या गाण्याचे गायक आणि संगीतकार यांनी हे गाणे लाईव्ह गायले होते. त्यावेळी संपूर्ण सभागृहात एक जल्लोष पाहायला मिळाला होता. या गाण्याला अमेरिकेसह जगभरातील प्रेक्षकांनी पसंत केले व त्याची रील्स बनवली. यंदाच्या पुरस्कार सोहळ्यात गुनीत मोंगा आणि कार्तिकी गोन्साल्विस यांच्या 'द एलिफंट व्हिस्पर्स' या लघुपटालाही ऑस्कर पुरस्कार मिळाला. अशा प्रकारे या वर्षी भारताने दोन ऑस्कर जिंकले.
यावर्षी दीपिका पदुकोण ऑस्कर सोहळ्याशी प्रस्तुतकर्ता म्हणून जोडली गेली होती. आरआरआर या चित्रपटाने यावर्षी विविध श्रेणींमध्ये पाचहून अधिक आंतरराष्ट्रीय पुरस्कार जिंकले आहेत. या चित्रपटात सुपरस्टार राम चरण आणि ज्युनियर एनटीआर यांनी प्रमुख भूमिका साकारल्या होत्या.