नवी दिल्ली : 95 व्या ऑस्कर पुरस्कार 2023 मध्ये 'आरआरआर' या चित्रपटातील नाटू-नाटू' या हिट गाण्याला ऑस्कर मिळाल्याबद्दल देशभरात आनंदाचे वातावरण आहे. सर्वत्र जल्लोष सुरू आहे. या ऐतिहासिक विजयाबद्दल आरआरआर संघावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. आरआरआरचे चाहते सोशल मीडियावरही जोरदार अभिनंदन करत आहेत. राजामौली आणि त्यांच्या संपूर्ण टीमला दक्षिण आणि बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीकडून खूप प्रेम आणि शुभेच्छा मिळत आहेत. देशाला अभिमान वाटणाऱ्या या आनंदाच्या बातमीवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑस्कर जिंकल्याबद्दल आरआरआरच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन केले आहे.
आरआरआरच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन : 'नाटू-नाटू'ने ऑस्कर जिंकल्यापासून सातत्याने अभिनंदनाचा वर्षाव सुरू आहे. ऑस्कर जिंकल्याबद्दल आरआरआरच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन करताना, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संगीतकार कोडुरी मरकटमणी कीरावानी आणि 'नाटू-नाटू' गाण्याचे गीतकार चंद्र बोस यांचे विशेष कौतुक केले आहे. त्यामुळे या गाण्याला जगभरात आदर मिळाला आहे. याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कार्तिकी गोन्साल्विस दिग्दर्शित आणि गुनीत मोंगा निर्मित द एलिफंट व्हिस्पर्स या चित्रपटाचे 95 वा अकादमी पुरस्कार जिंकल्याबद्दल अभिनंदन केले आहे. त्याला सर्वोत्कृष्ट लघुपटाचा पुरस्कार मिळाला आहे.