मुंबई- इशान खट्टरचा आगामी चित्रपट 'पिप्पा'च्या निर्मात्यांनी चित्रपट थिएटरमध्ये न येता ओटीटीवर प्रदर्शित होणार असल्याच्या चर्चेला पूर्ण विराम देण्याचा प्रयत्न केला आहे. याबाबत त्यांनी एका मासिकात खुलासा केला आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये १९७१ मध्ये झालेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवरील या चित्रपटाचे प्रदर्शन थिएटरमध्ये ोणार असल्याचे निर्मात्यांनी सांगितले. गेल्या काही दिवसापासून पिप्पाचे निर्माते आणि मल्टीप्लेक्सचे मालक यांच्यात मतभेद असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. याचाही खुलासा निर्मात्यांनी केला आहे.
1971 च्या लढाईवर आधारित 'पिप्पा'च्या हा चित्रपट डिजिटल पद्धतीने प्रदर्शित केला जाईल, अशा अफवा होत्या. चित्रपट निर्मात्यांना मल्टिप्लेक्स मालकांची अडचण होत असल्याच्याही अफवा पसरल्या होत्या. या सर्व अफवा चित्रपटाचे निर्माते रॉनी स्क्रूवाला, सिद्धार्थ रॉय कपूर आणि कमल ग्यानचंदानी यांनी चुकीच्या असल्याचे म्हटलं आहे. शुक्रवारी दिलेल्या निवेदनात म्हटलंय की आमच्याशी कोणताही संवाद न साधता काही वेब साईटनी या बातम्या चालवल्या होत्या. निर्मात्यांनी सर्व अफवांचे खंडन केले आहे. औपचारिक प्रदर्शनाची तारीख लवकरच जाहीर केली जाईल, असेही ते म्हणाले.