महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Photo of the day: आमिर खान, हृतिक रोशन आणि अल्लू अर्जुनचा एकत्रीत फोटो बनला 'फोटो ऑफ द डे' - मधु मंटेना आणि इरा त्रिवेदी

मधु मंटेना आणि इरा त्रिवेदी यांच्या रिसेप्शन सोहळ्याला अनेक दिग्गज कलाकार हजर होते. यावेळी बॉलिवूड सुपरस्टार आमिर खान, हृतिक रोशन आणि साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुन यांनी एक्तर फोटोला पोज दिली आणि सर्वांचे लक्ष वेधून घेतले. हा फोटो आता इंटरनेटवर चर्चेचा विषय बनलाय.

Photo of the day
हृतिक रोशन आणि अल्लू अर्जुनचा एकत्रीत फोटो

By

Published : Jun 12, 2023, 1:30 PM IST

मुंबई - मधु मंटेना आणि इरा त्रिवेदी यांनी मुंबईतील पंचतारांकित जेडब्ल्यू मॅरियट हॉटेलमध्ये लग्नाचे रिसेप्शन आयोजित केले होते. यासाठी आमिर खान, हृतिक रोशन, अनिल कपूर, जॅकी श्रॉफ यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. हृतिक रोशन, अल्लू अर्जुन आणि आमिर खान या त्रिकुटाने एकतर फोटोसाठी पोज दिली तो क्षण नेटिझन्सचे लक्ष वेधणारा होता.

रिसेप्शन पार्टीत तिन्ही सुपरस्टार एन्जॉय करताना दिसले. त्यांनी एकमेंकाचे हासून स्वागत केले जे दिग्गज सेलेब्रिटींच्या मांदियाळीत एक आकर्षण बनले होते. विवाब बंधनात अडकल्यानंतर मधु आणि इरा यांनी त्यांच्या मित्रांसाठी आणि चित्रपट व्यवसायातील सहकाऱ्यांसाठी लग्नाचे रिसेप्शन ठेवले होते, ज्यामध्ये हृतिक रोशन त्याची प्रेयसी सबा आझाद सोबत हजर राहिला होता.

काळ्या रंगाच्या टक्सिडोमध्ये ह्रतिक रोशन डॅपर दिसत होता. आमिर खानने पांढरा कुर्ता आणि डेनिम जीन्स परिधान केली होती. दुसरीकडे साऊथचा सुपरस्टार अल्लू अर्जुन काळ्या कुर्त्यामध्ये डॅशिंग दिसत होता. फोटोंमध्ये हृतिक आणि अल्लू एकमेकांशी मैत्रीपूर्ण वागताना दिसत असून ही फोटो पोज आमिर खान एन्जॉय करताना दिसला.

रिसेप्शन समारंभासाठी मधूने निळ्या रंगाचा पारंपारिक पोशाख परिधान केला होता, तर इरा पांढऱ्या टोन्डच्या सिक्वेन्स केलेल्या लेहेंग्यात अतिशय सुंदर दिसत होती. तिने तिचे केस मोकळे ठेवले आणि हिरव्या पन्ना डायमंड सेटसह ऍक्सेसराइज केले. या समारंभासाठी इराने तिच्या लग्नाला मॅचिंग टॉप आणि गोल्डन स्टेटमेंट बेल्टसह आकर्षक गुलाबी साडी नेसली होती. तिने स्टेटमेंट नेकलेस आणि ट्रेंडी मांग टिकासह तिचा लूक आकर्षक बनवला होता.

मधु मंटेनाने यापूर्वी ड्रेस डिझायनर मसाबा गुप्ताशी लग्न केले होते. मात्र त्यांच्या संसार फार काळ टिकू शकला नव्हता. त्यानंतर दोघांनी विभक्त व्हायचा निर्णय घेतला. मधु मंटेना यांने पुन्हा एकदा बोहल्यावर चढण्याचा निर्णय करत लेखिका आणि योगा प्रशिक्षक इरा त्रिवेदीसोबत लग्न केले आहे.

हेही वाचा -

१.Madhu Mantena Wedding : मसाबा गुप्ताचा पूर्व पती मधु मंटेना इरा त्रिवेदीसोबत पुन्हा चढला बोहल्यावर

२.खास मराठी प्रेक्षकांसाठी बहुभाषिक ‘1 ओटीटी’ च्या मराठी प्रभागाचा शुभारंभ, स्वप्नील जोशी असेल 'ब्रँड फेस'!

३.Rubina Dilaik Car Accident: बिग बॉस फेम रुबिनाच्या कारचा अपघात; ट्विट करून दिले हेल्थ अपडेट

ABOUT THE AUTHOR

...view details