मुंबई - अभिनेत्री पायल रोहतगी हिने रिअॅलिटी टीव्ही शो लॉक अपमध्ये आपल्या मूल होणार नसल्याची भावनिक कबुली प्रेक्षकांसमोर जड अंतःकरणाने दिली होती. वारंवार प्रयत्न करूनही तिला गर्भधारणा होऊ न शकल्याबद्दल पायल कॅमेऱ्याशी बोलताना ती कोलमडली होती. पायलने असेही सांगितले होते की, तिच्या आणि संग्राम सिंगच्या लग्नाला उशीर होण्यामागे हे कारण आहे.
संग्राम सिंग याने अलीकडेच बंदिवासावर आधारित रिअॅलिटी शो 'लॉक अप'ला भेट दिली होती. त्याची प्रेयसी पायल रोहतगी या शोमध्ये आहे, ती शोमधून बाहेर पडताच संग्रामला तिच्याशी लग्न करायचे आहे, असे संग्राम सिंगने सांगितले, तो म्हणाला की त्यांच्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांच्यातील प्रेम. त्याने असेही नमूद केले की त्याच्याकडे आणि पायलकडे मुले होण्यासाठी सरोगसी आणि दत्तक घेण्याचा पर्याय आहे. पायलने 'लॉक अप' शोमध्ये सांगितले की, "मी गरोदर राहू शकत नाही. आम्ही 4-5 वर्षापासून मुलं होण्यासाठी प्रयत्न करत आहोत, मी IVF करून पाहिलं, पण तसं होत नाही. आणि एकदा ट्रोलने मला वांझोटी म्हटले होते. मला संग्रामबद्दल वाईट वाटते कारण त्याला मुले आवडतात, मला मुले होऊ शकत नाहीत, तो स्वतःची मुले असण्यास पात्र आहे."
याबाबत मीडियाशी बोलताना सग्रामने सांगितले, "पायल ही खूप धाडसी मुलगी आहे. मला तिचा अभिमान आहे. होय, तिचा IVF अयशस्वी झाला आणि डॉक्टरांनी तिला सांगितले की ती गर्भधारणा करू शकणार नाही. पण, मग काय? सर्वात महत्त्वाचे म्हणजे आम्ही आपण जसे आहोत तसे एकमेकांवर प्रेम करत राहू. उद्या मलाही हाच त्रास होऊ शकला असता; कदाचित मी मुले निर्माण करू शकलो नसतो. तेव्हा पायलने मला सोडले असते का? नक्कीच नाही. होय, तिने मला सांगितले की मी दुसरी कुणीतरी लग्नसाठी शोधली पाहिजे आमि माझी स्वतःची मुले असली पाहिजेत, यावर मी फक्त हसलो. आम्ही एकत्र आहोत आणि कायम एकत्र राहू."