मुंबई - दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेता पवन कल्याणची माजी पत्नी रेणू देसाई हिने सांगितले की, तिला हृदय आणि इतर आरोग्य समस्या आहेत. अभिनेत्री रेणूने सोशल मीडियावर सांगितले की कठीण काळात शक्ती शोधणे सोपे नाही परंतु ती तिचा विश्वास अबाधित ठेवेल आणि एक वेळ असा येईल की पुन्हा तिची प्रगती साधेल.
इन्स्टाग्रामवर रेणूने एक फोटो शेअर केला ज्यात तिने कॅप्शन दिले आहे की, 'माझ्या आसपास असलेल्या सर्व प्रियजनांना माहिती आहे की मी काही वर्षांपासून हृदयाच्या आणि इतर काही आरोग्याच्या समस्यांशी सामना करत आहे आणि कधीकधी मला हे सर्व समजण्यासाठी शक्ती शोधणे खूप कठीण होते. पण आज मी हे पोस्ट करण्यामागचे कारण म्हणजे स्वतःच्या समस्यांशी झगडत असलेल्या स्वतःची आणि इतर अनेकांची आठवण करून देणे हे आहे. काहीही झाले तरी आपण खंबीर असले पाहिजे आणि सध्या सुरु असलेल्या प्रक्रियेवर विश्वास ठेवला पाहिजे आणि एक दिवस ते पूर्ण केले पाहिजे.'
रेणूने पुढे लिहिलंय की, 'स्वतःवरील आणि जीवनातील आशा गमावू नका. आपल्यासाठी विश्वाच्या स्वतःच्या अशा छान, गोड योजना आहेत. पेंग्वीनने एका ठिकाणी म्हटलंय, 'फक्त हसत रहा आणि लहरी निर्माण करा मुलांनो, स्माईल अँड वेव.' पुढे तिने कंसात लिहिलंय की, उपचार, औषधोपचार, योग, पोषण इत्यादी चालू आहेत आणि आशा आहे की मी लवकरच सामान्य जीवनात परत यावे आणि शूटिंगला जावे.'