मुंबई : पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर खळबळ माजवणाऱ्या शाहरुख खानच्या 'पठाण'ने दुसऱ्या दिवशी 70 कोटींची कमाई करीत बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. २६ जानेवारीच्या सुटीत 'पठाण'ने हा पराक्रम केला. त्याचवेळी, 25 जानेवारीला नॉन हॉलिडेला रिलीज झालेल्या या चित्रपटाने भारतीय बॉक्स ऑफिसवर 57 कोटी रुपयांचे खाते उघडले. आता या चित्रपटाची तिसऱ्या दिवसाची कमाई समोर आली आहे. पहिल्या आणि दुसऱ्या दिवसाच्या तुलनेत तिसऱ्या दिवशी 'पठाण'ची कमाई खूपच कमी आहे. मात्र, या चित्रपटाने जगभरात 300 कोटींचा टप्पा ओलांडला असून, भारतीय बॉक्स ऑफिसवर 150 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे.
पठाण बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस 3 :'पठाण'ने तिसऱ्या दिवशी देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर 34 कोटींची कमाई केली आहे, जी दुसऱ्या दिवसाच्या कलेक्शनच्या (70 कोटी) निम्मेही नाही. पठाणने दुसऱ्या दिवसाच्या कमाईत हिंदी पट्ट्यातील सर्व रेकॉर्ड उद्ध्वस्त केले होते. मात्र, तिसऱ्या दिवसाच्या कमाईत तो 'दंगल', 'बाहुबली-2' आणि 'केजीएफ-2' पेक्षा खूपच मागे पडला.
या चित्रपटांचे रेकॉर्ड नाही तुटले :शुक्रवारी (सार्वजनिक सुटी नसताना) 'पठाण' पुन्हा एकदा निस्तेज दिसला. 'पठाण'च्या तुलनेत इतर हिंदी-दक्षिण चित्रपटांच्या तिसऱ्या दिवसांच्या कमाईबद्दल बोलायचे, तर रणबीर कपूर स्टारर 'संजू' (46.71 कोटी) , बाहुबली-2 (46.5 कोटी), KGF-2 (42.09 कोटी), सलमान खानचा चित्रपट 'टायगर जिंदा है' (45.53) आणि आमिर खानचा चित्रपट 'दंगल'ने 41.34 कोटींची कमाई केली.