Pathaan Collection Day 1: पहिल्याच दिवशी कलेक्शनमध्ये 'पठाण'ने KGF-2 ला टाकले मागे; सर्वात मोठा ओपनर चित्रपट ठरला - KGF 2 ला टाकले मागे
शाहरुख खानच्या 'पठाण' चित्रपटाने इतिहास रचला आहे. 'KGF-2' चा रेकॉर्ड मोडून हा चित्रपट भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात मोठा ओपनर चित्रपट ठरला आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर एका दिवसात किती कमाई केली ते जाणून घेऊया.
पहिल्याच दिवशी कलेक्शनमध्ये 'पठाण'ने KGF-2 ला टाकले मागे; सर्वात मोठा ओपनर चित्रपट ठरला
By
Published : Jan 26, 2023, 2:30 PM IST
मुंबई : बॉलिवूडचा बादशहा शाहरुख खानने तब्बल चार वर्षांनी 'पठाण' चित्रपटातून धमाकेदार पुनरागमन केले आहे. चाहत्यांची वाढती क्रेझ आणि कोलाहल या दरम्यान हा चित्रपट बुधवारी (25 जानेवारी) प्रदर्शित झाला. चित्रपट येताच त्याच्या वादाला तोंड फुटले. त्यातील आक्षेपार्ह दृश्ये यामुळे चित्रपटाच्या बाॅयकाॅटच्या चर्चा होऊ लागल्या. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच चित्रपट वादात अडकला होता.
चाहत्यांना किंग खानला रुपेरी पडद्यावर पाहताना आनंद :किंग खानला चार वर्षांनंतर रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी चाहत्यांना आनंद झाला. चित्रपटगृहांच्या आत आणि बाहेर सर्वत्र जल्लोषाचे वातावरण होते. त्याचबरोबर या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी कमाईचे रेकॉर्ड तोडले. ट्रेड अॅनालिस्टने भारतातील 'पठाण' चित्रपटाच्या एका दिवसाच्या कमाईचा आकडा शेअर केला आहे.
'पठाण'ने 'KGF Chapter 2' चा मोडला विक्रम :ट्रेड अॅनालिस्ट रमेश बाला यांच्या मते, 'पठाण' चित्रपटाची ओपनिंग जोरदार आणि धमाकेदार होती. या चित्रपटाने एका दिवसात 54 कोटींची कमाई केली. शाहरुख खानचा चित्रपट आतापर्यंतचा सर्वात मोठा नॉन हॉलिडे ओपनर म्हणून उदयास आला आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी अनेक सुपरहिट चित्रपटांचे रेकॉर्ड तोडले. पठाणने प्रशांत नीलच्या 100 कोटी रुपयांच्या बजेटच्या 'KGF Chapter 2' चित्रपटाचा विक्रम मोडला आहे.
सर्वाधिक कमाई करणारा ठरला चित्रपट :पठाणने 14 एप्रिल 2022 रोजी रिलीज झालेल्या 'KGF-2' 'KGF Chapter 2' ची धूळ चाटली. बॉक्स ऑफिसवर सर्वात मोठे ओपनिंग कलेक्शन करणार होते. या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनने पहिल्या दिवशी 53.95 कोटींची कमाई केली. 'KGF Chapter 2' नंतर, सिद्धार्थ आनंदचा चित्रपट 'वॉर' हा बॉलिवूडचा सर्वात मोठा ओपनिंग कलेक्शन होता. 2 ऑक्टोबर 2019 रोजी रिलीज झालेल्या 'वॉर' चित्रपटाने पहिल्या दिवशी 53.35 कोटींचा व्यवसाय केला होता. पण, आता पठाणने हे मोठे चित्रपट उद्ध्वस्त केले आहेत. पठाणने एका दिवसात 54 कोटींची कमाई करून सर्वात मोठ्या ओपनर चित्रपटाचा विक्रम केला आहे.