मंबई- बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा सध्या तिच्या डेटिंग लाइफमुळे चर्चेत आहे. राजकारणी राघव चड्ढासोबत स्पॉट झालेल्या या अभिनेत्रीला त्याच्यासोबत डिनर आणि लंच डेट करताना अनेकांनी पाहिले आहे. गेल्या काही दिवसापासून टेडिंगची चर्चा सुरु असताना आता या चर्चेची जागा लग्नाच्या चर्चेपर्यंत आली आहे. परिणीतीने डिझायनर मनीष मल्होत्राच्या मुंबईतील निवासस्थानी भेट दिल्याने आगीत आणखीनच भर पडली आणि अटकळ वाढली.
मनिष मल्होत्राच्या घरी पोहोचली परिणीती चोप्रा - रविवारी रात्री परिणीती वांद्रे येथील मनीषच्या घरी जाताना दिसली. या यावेळी परिणीता काळ्या रंगाचा वन-शोल्डर मिडी ड्रेस मॅचिंग पंपसह दिसली. तिने आत जाण्यापूर्वी शटरबग्ससाठी थोडक्यात पोझ देताना परिणीती हसली. तिचे फोटो आणि व्हिडिओ ऑनलाइन समोर आल्यानंतर, राघव चड्ढासोबतच्या तिच्या लग्नाबद्दलच्या अटकळींना उधाण आले. इंस्टाग्रामवर एका पापाराझोने शेअर केलेला, परिणीतीच्या मनिष मल्होत्राच्या घरी भेटीच्या व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील व्हिडिओनंतर प्रतिक्रियांची लाट आली आहे. या घडीला नेटिझन्स अभिनेत्री परिणीतीच्या लग्नाच्या पोशाखाबद्दल चर्चा करण्यात गुंतले आहेत. मनीषने डिझाइन केलेल्या कियारा अडवाणीच्या लग्नातील लेहेंग्याचा संदर्भ देत, एका नेटिझनने लिहिले,आणि मला आशा आहे की पोशाख गुलाबी असणार नाही. दरम्यान, अनेकांना परिणीती तिच्या काळ्या पोशाखात अस्वस्थ वाटली.