महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Parineeti chopra video : परिणीती चोप्रा विमानतळावर झाली स्पॉट, टोपीवर लिहिलेल्या नावावरून चाहत्यांमध्ये चर्चा - parineeti chopra spotted at the airport

Parineeti chopra video : बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि राजकारणी राघव चढ्ढा लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. दरम्यान नुकतीच परिणीती ही विमानतळावर स्पॉट झालीय.

Parineeti chopra video
परिणीती चोप्राचा व्हिडिओ

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 17, 2023, 5:00 PM IST

मुंबई - Parineeti chopra video : चाहते अभिनेता परिणीती चोप्रा आणि खासदार राघव चढ्ढा यांच्या लग्नाची आतुरतेनं वाट पाहत आहेत. या जोडप्यांच्या लग्नाची तयारी जोरात सुरू आहे. 24 सप्टेंबर रोजी उदयपूरमध्ये हे दोघे शाही पद्धतीनं लग्न करणार आहेत. लग्नाच्या तयारीदरम्यान, राघव चढ्ढा आणि परिणीती हे नुकतीच विमानतळावर स्पॉट झाले. विमानतळावर परिणीती चोप्रानं पांढऱ्या टी- शर्टसह निळ्या रंगाचा शर्ट आणि जीन्स परिधान केला होता. यावर तिनं एक टोपी घातली होती. या टोपीवर तिच्या होणाऱ्या पती राघव यांच्या नावाचे पहिले अक्षर 'आर' असं लिहिलं होतं. परिणीती चोप्रा या लूकमध्ये खूप खास दिसत होती. तिचा हा लूक चाहत्यांना खूप आवडला आहे.

परिणीती चोप्रा पापाराझींवर चिडली : परिणीतीचा काल एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला होता. व्हिडिओमध्ये परिणीती पापाराझींवर चिडताना दिसत होती. यावेळी ती गाडीतून खाली उतरताच पापाराझींनी तिच्यासमोर कॅमेरे आणले. त्यानंतर पापाराझीच्या या कृतीवर तिला राग आला. परिणीतीनं पापाराझीला म्हटलं, 'मी तुम्हाल आमंत्रण दिलं नाही.' असं तिनं सांगितलं. त्यानंतर परिणीतीनं हात जोडून म्हटलं की, 'फोटो काढणं बंद करा'. याप्रकरणी अनेक सोशल मीडिया यूजर्सनं परिणीती चोप्राला समर्थन दिलं. परिणीतीच्या लग्नाबद्दल बोलायचं झालं तर, हे जोडपे 24 सप्टेंबर रोजी उदयपूरच्या 'द लीला पॅलेस'मध्ये सात फेरे घेतील. या लग्नामध्ये अनेक बॉलिवूड कलाकार आणि राजकारणी उपस्थित राहणार आहेत.

राघव चढ्ढा हे राजेशाही शैलीत प्रवेश करणार :राघव चड्ढा हे आपल्या वधूला घेण्यासाठी हत्ती, घोडा किंवा गाडीवर येणार नाही. ते परिणीती चोप्राला शाही बोटीमधून घेऊन जाणार आहेत. त्यानंतर हे जोडपे बोटीनं हॉटेल ताज येथे पोहोचणार आहे. त्याचबरोबर लग्नाच्या या शाही प्रवेशाची तयारीही जोरात सुरू आहे. याशिवाय या जोडप्याच्या लग्नाची निमंत्रण पत्रिका ही सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत. आता अनेकदा परिणीती ही लग्नाची शॉपिंग करताना दिसते.

हेही वाचा :

  1. Happy Birthday PM Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 'या' बॉलिवूड सेलिब्रिटींनी दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा...
  2. SIIMA 2023 full winners list: दक्षिण भारतीय आंतरराष्ट्रीय पुरस्कार झाला दुबईत संपन्न...
  3. Salman khan : सलमान खाननं भाची अलीजेह अग्निहोत्रीसाठी लिहिली खास पोस्ट; वाचा...

ABOUT THE AUTHOR

...view details