मुंबई -Parineeti Wrote A Special Thank You Note: बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा यांचे नुकतेच उदयपूरमधील लीला पॅलेसमध्ये धूमधडाक्यात लग्न झाले. या जोडप्याच्या लग्नामध्ये अनेक सेलिब्रेटींनी हजेरी लावली होती. तसेच अनेकांनी परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा यांना सोशल मीडियाद्वारे शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान आता परिणीती चोप्रानं इंस्टाग्राम अकाउंटवर एक नोट शेअर केली आहे. या नोटमध्ये तिनं आपल्या चाहत्यांचं आणि सेलिब्रेटींचं मनापासून आभार मानले आहे. परिणीती चोप्रा आणि आप पार्टीचे खासदार राघव चढ्ढा यांची 13 मे रोजी दिल्लीतील कपूरथला हाऊसमध्ये एंगेजमेंट झाली होती. तेव्हापासूनच हे कपल खूप चर्चेत होते.
परिणीतीनेही सोशल मीडियावर लिहलं नोट : परिणीतीनं इंस्टाग्राम अकाउंटवर लिहिलं, गेल्या काही दिवसांत आम्ही जे काही ऐकले, पाहिले आणि वाचले त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार! या नव्या प्रवासात तुम्ही सर्व आमच्यासोबत आहात हे आम्हाला माहीत आहे. आमच्या मीडिया सहकाऱ्यांना खूप खूप धन्यवाद. दिवसभर आमच्यासोबत राहिल्याबद्दल आणि आम्हाला आनंद दिल्याबद्दल धन्यवाद. त्यानंतर आता परिणीतीची आई रीना चोप्रानं देखील मुलीच्या लग्नाबद्दल अभिनंदन व्यक्त करणारी एक सुंदर नोट लिहिली आहे.आनंद व्यक्त करत त्यांनी लिहलं, जीवनात अशा काही गोष्टी आहेत ज्यामुळे तुमचा विश्वास आणखी वाढतो की होय, एक देव आहे जो प्रत्येक गोष्टीची काळजी घेतो. ज्यांनी माझ्या मुलीला नेहमी आठवण ठेवलं त्या सर्वांचे आभार. अशा पध्दतीनं त्यांनी थॅक्यू नोट लिहली आहे.