मुंबई : बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री परिणीती चोप्रा लवकरच लग्न बंधनात अडकणार आहे. आम आदमी पक्षाचे खास नेते आणि पंजाबचे राज्यसभा खासदार राघव चढ्ढासोबत ती लवकरच लग्न करणार आहे. या जोडप्याने चालू वर्षात साखपूडा दिल्लीमध्ये केला होता. आता चाहते या हाय-प्रोफाइल जोडप्याच्या लग्नाची वाट पाहत आहेत. या वर्षा अखेरीस हे दोघे लग्न करणार असल्याचे बोलले जात आहे. काही दिवसापूर्वी हे जोडपे लंडनमध्ये लग्नाची खरेदी करताना दिसले होते. याशिवाय परिणीती अनेकदा राघव चढ्ढा यांना भेटण्यासाठी दिल्लीत जात असते. दरम्यान आता परिणीती चोप्राने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती गाणे गाताना दिसत आहे. परिणीती खूप सुंदर गाते हे सर्वांनाच माहित आहे.
परिणितीने गायले गाणे : परिणिती अनेकदा सोशल मीडियावर तिच्या गाण्याचे व्हिडिओ पोस्ट करत असते. परिणितीने 'ममता' (१९९६) चित्रपटातील 'रहे ना रहे' हे सुपरहिट गाणे तिच्या सुंदर आणि मधुर आवाजात गायले आहे. हे गाणे दिवंगत पार्श्वगायिका लता मंगेशकर यांनी गायले होते. आता परिणीतीने हे गाणे तिच्या खास शैलीत गाण्याचा प्रयत्न केला आहे. फिकट सोनेरी-हिरव्या रंगाच्या सूटमध्ये सोफ्यावर बसलेली परिणीती तिच्याच सुरात मग्न होऊन गाताना दिसत आहे. त्याचबरोबर हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर झाल्यानंतर चाहते तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करत तिची प्रशंसा करत आहे.