मुंबई - Parineeti Chopra Maldives Vacation :अभिनेत्री परिणीती चोप्रानं या वर्षाच्या सुरुवातीला राघव चड्ढाशी लग्न केले आणि तेव्हापासून ती चर्चेत आहे. दरम्यान परीनं सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट केली आहेत. या फोटोमध्ये ती गर्ल गँगसोबत दिसत आहे. लग्नानंतर परिणीती आपला वेळ मोकळेपणाने एन्जॉय करत आहे. लग्नानंतर परिणीती चोप्रा पती राघव चढ्ढासोबत हनीमूनऐवजी तिच्या 'गर्ल गँग'सोबत त मालदीवला गेली होती. परिणीतीनं गुरुवारी तिच्या इंस्टाग्राम पेजवर मालदीव व्हेकेशनमधील थ्रोबॅक फोटो शेअर केले आहेत.
परिणीतीनं फोटो केले शेअर : परिणीतीनं या पोस्टवर सुंदर कॅप्शन देताना लिहलं, 'सर्वोत्तम थ्रोबॅक म्हणजे, जेव्हा तुम्ही मुलींच्या गँगसोबत ट्रिपला जाता, ज्यामध्ये तुमची आई आणि सासूही असते! आदरातिथ्य केल्याबद्दल वॉल्डॉर्फ अस्टोरियाचे विशेष आभार! आम्ही पुन्हा परत येण्यास उत्सुक आहोत'. फोटोमध्ये परिणीती चोप्रा कुटुंबासोबत फोटोसाठी पोझ देताना दिसत आहे. एकात फोटोमध्ये ती सायकल चालवताना दिसत आहे आणि दुसऱ्या फोटोमध्ये ती तिच्या सासूसोबत पोझ देताना दिसत आहे. परिणीतीच्या या फोटोला चाहत्यांनी खूप पसंती केलं आहे. ती गर्ल गँगसोबत बीचवर एन्जॉय करताना दिसत आहे. तिच्या फोटोवर तिच्या एका चाहत्यानं कमेंट करत म्हटलं, 'तुझे फोटो खूप खास आहे.' आणखी एका चाहत्यानं लिहलं 'खूप मजा करत राहा फोटो खूप सुंदर आहेत' अशा अनेक कमेंट या फोटोवर येत आहे. काहीजण या फोटोवर फायर आणि हार्ट इमोजी पोस्ट करत आहेत. परिणीती चोप्रानं या वर्षी 24 सप्टेंबर रोजी उदयपूरमध्ये राघव चढ्ढासोबत लग्न केले.