मुंबई - Parineeti Chopra Pictures :अभिनेत्री परिणीती चोप्रा लग्नानंतर पहिल्यांदा घराबाहेर पडली आहे. तिनं सोशल मीडियावर फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये हनीमूनला गेली नसल्याचं स्पष्ट केलं आहे. फोटोंमध्ये परिणीती चोप्रा तिच्या हातात सुंदर बेबी पिंक रंगाच्या बांगड्या घातलेली दिसत आहे. समुद्रकिनाऱ्यावर ती सध्या चांगला वेळ घालवत आहे. दरम्यान, आता तिचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या फोटोमध्ये ती केस मोकळे सोडून समुद्रकिनाऱ्यावर एन्जॉय करताना दिसतेय. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोंना अनेकजणांनी लाईक केलंय.
परिणीतीनं व्हेकेशनचे फोटो केले शेअर : परीनं इंस्टाग्राम फोटोवर कॅप्शन लिहलं, 'मी हनीमूनवर नाही. हा फोटो माझ्या वहिनीने काढला आहे.' याशिवाय परिणीतीनं कॅप्शनमध्ये गर्ल्सट्रिप हा हॅशटॅगही लिहिला आहे. एका युजरनं या पोस्टवर कमेंट करत लिहिलं की, 'परी तुझे लूक खूप खास आहे'. दुसऱ्यानं लिहिलं, 'असो, आजकाल ईडीचे लोक तुम्हाला पकडत आहेत. आणखी एका युजरनं लिहिलं की, 'मला वाटतं की तुझ्या पतीसोबत हनिमूनला जाण्यापेक्षा तुझ्या वहिनीसोबत हनिमूनला जाणं आणि तिच्याशी चांगले नातं जोडणं जास्त महत्त्वाचं आहे.' अशा अनेक कमेंट परीच्या पोस्टवर येत आहेत. याशिवाय काहीजण या पोस्टवर हार्ट आणि फायर इमोजी पोस्ट करत आहेत.