मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आपचे खासदार राघव चड्ढा लवकरच बोहल्यावर चढणार आहे. दोन दिवसापूर्वी त्यांनी राजस्थानमध्ये जाऊन विवाहस्थळ पाहिले आहे. त्यामुळे हे डेस्टीनेशन वेडिंग राजस्थानमध्ये होणार अशी अटकळ बांधली जात आहे. परिणीती आणि राघव इतकीच पापाराझींनाही त्यांच्या लग्नांची घाई झालेली आहे. दोघे तिथेही जातात तिथे त्यांना लग्नाची तारीख काय ठरली ? असा एक अनाहुत प्रश्न विचारला जातो. या प्रश्नाचे काय उत्तर द्यायचे यावर दोघेही भांबावलेले असतात.
नुकतीच परिणीती चोप्रा एका इमारतीतून बाहेर पडताना दिसताच पापाराझींनी तिला बोलते करायचा प्रयत्न केला. प्रश्न नेहमीचाच होता की, लग्न कधी करताय? खरंतर जाईल तिथे विचारल्या जाणाऱ्या या प्रश्नामुळे परिणीती वैतागली असती पण इतक्या प्रमाने विचारल्या जाणाऱ्या या प्रश्नावर हसून किंवा लाजून प्रतिक्रिया न देणे इतकेच तिच्या हातात उरले आहे.
इंस्टाग्रामवर पापाराझी अकाऊंटने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये परिणीती चोप्रा पांढरा कुर्ता आणि मॅचिंग पलाझो परिधान केलेली दिसते. तिने आपले केस वेणीमध्ये बांधले होते आणि डोळ्यावर गडद सनग्लासेस घातले होते. तिला विचारण्यात आले, 'शादी की तारीक क्या है? कुछ तो बताओ, छुपाओ मत. 'त्यानंतर परिणीतीने तिच्या टीम मेंबरकडे बोट दाखवून सांगितले, 'हिला माहित आहे.' फोटोग्राफर्सनी परिणीतीला राघवसोबतच्या लग्नाचे आमंत्रण द्यायला सांगितले तेव्हा ती लाजताना दिसली. तिच्या कारमधून निघण्यापूर्वी परिमीतीने सर्वांना हसून बाय केले.
राघव चड्ढा आणि परिणीती चोप्राचा विवाह हा सध्या फिल्म आणि राजकीय क्षेत्रातील मोठा विवाह सोहळा मानला जातो. दिल्लीत पार पडलेल्या साखरपुड्याला पंजाब आणि दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी हजेरी लावली होती. आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार असलेल्या राघव चड्ढा यांचा जनसंपर्क खूप मोठा आहे. अतिशय प्रगल्भ राजकारणी म्हणून ते उदयाला आले आहेत आणि आपल्या प्रभावी वाणी व अभ्यासू बोलण्याने त्यांनी टीव्ही पॅनलच्या चर्चेत भल्या भल्यांना गप्प केले आहे. दुसऱ्या बाजूला परिणीती चोप्रा ही बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीमधील नामवंत अभिनेत्री आहे. तिच्याही बाजून अनेक अभिनेता, अभिनेत्री , निर्माता आणि दिग्दर्शक अशी सेलेब्रिटींची मोठी फळी तिच्या समर्थनार्थ आहे. त्यामुळे दोन्ही बाजूच्या वऱ्हाड्यांचा विचार करता हे लग्न हाय प्रोफाइल असेल यात शंका बाळगण्याचे कारण नाही. त्यांच्या लग्नाची तारीख अखेर पापाराझी शोधून काढतील असा तात्पुरता विश्वास आपण बाळगूयात.