मुंबई- RagNeeti wedding: बॉलिवूडची लग्नाळू अभिनेत्री परिणीती चोप्रा येत्या काही दिवसांत आम आदमी पक्षाचे (आप) खासदार राघव चढ्ढासोबत लग्नबंधनात अडकणार आहे. राजस्थानातील उदयपूर येथे या पंजाबी लग्नासाठी लग्न मंडप सज्ज झालाय. लग्नाचा मुहूर्त निश्चित झाल्यानंतर या 'रागनिती' लग्नासाठी वधू आणि वरांच्या घरात लगीनघाई सुरू झालीय. दोघांचीही घरं रोषणाईनं उजळून निघाली आहेत.
परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा यांच्या लग्नाची तारीख आणि ठिकाण: परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा यांचा विवाह सोहळा 24 सप्टेंबर रोजी उदयपूर येथे पार पडेल. विवाहातील अनेक विधी भल्य लीला पॅलेसमध्ये होतील. मात्र प्रत्यक्ष लग्नगाठ सोहळा नयनरम्य ताज तलाव येथेच होणार आहे. रोमँटिक वातावरणात निसर्ग सौंदर्याच्या साक्षीने हा सोहळा पार पडेल.
90 च्या दशकातील लग्नाची थीम आणि संगीत:परिणीती चोप्रा राघव चढ्ढा यांच्या विवाहाची सुरूवात नॉस्टॅल्जियाची थीम संगीतापसून होईल. पाहुण्यांना ९० च्या दशकातील विवाह समारंभात असल्याचा भास होऊ शकेल. यासाठी नृत्य आणि संगीताचा मुड सेट करण्यात आलाय.
चुडा समारंभाने होईल लग्नसमारंभाची सुरुवात: 23 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता परिणीतीचा चुरा भरण्यात येईल. म्हणजेच पारंपरिक पद्धतीनं लाल रंगाच्या बांगड्या घालण्याचा विधी होईल. दुपारी १२ ते ४ या काळात दुपारच्या भोजनाचा काळ असेल. त्यानंतर ९० च्या दशकातील थीमवर आधारित पार्टी होईल. दुसऱ्या दिवशी 24 सप्टेंबर रोजी हे जोडपे विवाह बंधनात अडकेल.
लक्ष वेधणारे मेनू: लग्न सोहळ्यातील महत्त्वाच्या वैशिष्ट्यांपैकी एक म्हणजे पाहुण्यांना दिला जाणारा भव्य पंजाबी मेनू. परिणिती आणि राघव दोघेही पंजाबी पार्श्वभूमीचे आहेत हे लक्षात घेऊन, पाककृतीची निवड पारंपरिक पंजाबी व्यंजनांची असेल. लग्नाच्या मिरवणुकीतील एक वेगळेपण असेल. राघव चड्ढा गोड्याऐवजी बोटीतून विवाह स्थळी दाखल होणार आहे