मुंबई :बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा सध्या तिच्या लव्ह लाईफमुळे चर्चेत आहे. राघव चड्ढासोबतच्या साखरपुड्यानंतर तिचे नाव रोजच चर्चेत असते. कधी हे दोघे डिनर डेटवर स्पॉट होतात तर कधी एकत्र जेवण करताना दिसतात. त्याचबरोबर आता मीडियाच्याही नजरा या जोडप्यावर खिळल्या आहेत. तर दुसरीकडे, आता दोघेही त्यांच्या लग्नाच्या तयारीत व्यस्त आहेत. आता त्यांच्या लग्नाबाबत अनेक मोठे अपडेट्स समोर येत आहेत. राघव आणि परिणीतीनेही इतर स्टार्सप्रमाणे डेस्टिनेशन वेडिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. इतकेच नाही तर या दोघांनीही त्यांच्या या खास दिवसासाठी राजस्थानची निवड केली आहे. मीडिया रिपोर्ट्सवर , दोघेही उदयपूरमधील राजवाड्यात लग्न करू शकतात असे समजले आहे.
परिणीती चोप्राचे लग्न :परिणीती चोप्राच्या चुलत बहीणने म्हणजेच प्रियांका चोप्रानेही उदयपूरच्या राजवाड्यात लग्न केले होते. आता असे माहित होत आहे की, परिणीती आणि राघव यांना देखील लग्नासाठी उदयपूरचा 'द ओबेरॉय उदयविलास' आवडला आहे. हा वाडा पिचोला तलावाच्या काठावर आहे आणि येथे तुम्ही सुंदर तलाव आणि भव्य उद्यान देखील आहे. आता असे समजल्या जात आहे की, राघव आणि परिणिती दोघे हे ठिकाण वेडिंग डेस्टिनेशन बनवू शकतात. मीडिया रिपोर्ट्नुसार राघव आणि परिणीतीला त्यांचे लग्न खूप पारंपारिक ठेवायचे आहे. दोघांच्या कुटुंबीयांसाठी त्यांच्या प्रथा खूप महत्त्वाच्या आहेत आणि हे त्यांच्या साखरपुड्या मध्येही दिसून आले होते. परिणीती आणि राघव यांनी 13 मे रोजी नवी दिल्लीतील कपूरथला हाऊस येथे कुटुंबातील सदस्य आणि राजकीय दिग्गजांच्या उपस्थितीत साखरपुडा केला होता. या सोहळ्याला प्रियांका चोप्रा, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान आणि पी चिदंबरम उपस्थित होते.