महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Parineeti Chopra Bridal Lehenga : मनीष मल्होत्रानं परिणीती चोप्राच्या लेहेंग्याबद्दल केला खुलासा... - राघव चढ्ढा

Parineeti Chopra Bridal Lehenga : बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रानं तिच्या लग्नातील लेहेंग्यातून जपली आजीची आठवण. या लेहेंग्यामध्ये तिनं अशा काही गोष्टी डिझायनरला जोडायला लावल्या, ज्यामुळं तिचं कौतुक सोशल मीडियावर होत आहे.

Parineeti Chopra Bridal Lehenga
परिणीती चोप्राचा लेहेंंगा

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 27, 2023, 6:55 PM IST

मुंबई Parineeti Chopra Lehenga :अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा यांचं लग्न सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय आहे. या जोडप्यानं 24 सप्टेंबर रोजी उदयपूरमध्ये लग्नगाठ बांधली. आता सोशल मीडियावर त्यांच्या लग्नाचे काही व्हिडिओ आणि फोटो व्हायरल होत आहेत. या फोटोवर अनेक चाहते कमेंट करत आहेत. परिणीती चोप्रानं बुधवारी तिच्या अधिकृत इंस्टाग्राम स्टोरीजवर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंद्वारे तिनं सांगितलं की, तिच्या लग्नामधील लेहेंगा आपल्या लाडक्या आजीला समर्पित केला आहे. तसंच याबद्दल आता डिझायनर मनीष मल्होत्रानं देखील खुलासा केला आहे.

परिणीती चोप्रानं मानले आभार :परिणीती चोप्रानं आपल्या पोस्टमध्ये लिहिलं की, 'माझ्या खास दिवशी मला माझ्या आजीची आठवण आली, तिची एक झलक माझ्यावर होती. धन्यवाद एम.' पुढील पोस्टमध्ये, परिणीतनं तिच्या आजीची पारंपरिक की रिंग पोस्ट केली आहे. तसंच मनीष मल्होत्रानं देखील आपल्या पोस्टमध्ये परीचं कौतुक करत तिच्यासाठी खास नोट लिहिली आहे. या नोटमध्ये त्यानं लिहिलं, ही फक्त एक गोष्ट नव्हती हा परीच्या आजीचा एक महत्वपूर्ण भाग होता जो या खास दिवशी तिच्यासोबत होता'. मनीषच्या या पोस्टवर कमेंट करताना परिणीती चोप्रानेही कौतुक करुन म्हणाली, 'तुझ्यासारखं कोणी नाही..' आता या पोस्टवर अनेकजण कमेंट करत आहेत.

परीनं आजीला श्रद्धांजली वाहिली :परिणीतीच्या लेहेंग्याबद्दल खुलासा करताना मनिष मल्होत्रानं पुढं लिहिलं, मला आठवतंय जेव्हा मी परिणीती चोप्रासोबत लेहेंगाच्या डिझाईनबद्दल चर्चा केली होती, तेव्हा तिनं तिच्या आजीचा छल्ला आणि पारंपारिक की-चेनबद्दल सांगितलं होतं. या गोष्टी तिच्या लेहेंग्यामध्ये जोडल्या आहेत. हा लेहेंगा परिधान करून तिनं तिच्या आजीची आठवण जपली आहे. तिची आजी ही अंगठी तिच्या साडीसोबत घालायची, जी घरची बाई असण्याचं प्रतीक आहे. या लेहेंगामध्ये राघव आणि परिणीती संबंधीत काही घटक जोडले गेले आहेत. दरम्यान परी आणि राघव यांनी सर्वांचे आभार मानले आहेत.

हेही वाचा :

  1. Yash Chopras birth anniversary: यश चोप्रांमुळे 'बिग बी', 'किंग खान' बनले रोमँटिक हिरो
  2. Parineeti Wrote A Special Thank You Note: परिणीती चोप्रानं मानले चाहत्यांचे आभार ; सोशल मीडियावर थँक्स नोट केली शेअर...
  3. Tiger 3 : टायगरनं दिला चाहत्यांना खास संदेश, सलमान खानचा व्हिडिओ व्हायरल...

ABOUT THE AUTHOR

...view details