मुंबई : अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आम आदमी पक्षाचे नेते राघव चढ्ढा यांनी जेव्हापासून त्यांचे नाते अधिकृत केले तेव्हापासून ते खूप चर्चेत आले आहेत. या जोडप्याने बऱ्याच दिवसांपासून आपले नाते गुपित ठेवले होते. दरम्यान, साखरपुडा झाल्यानंतर या जोडप्याने आपले नाते जगासमोर ठेवले. आता परिणीती आणि राघव यांच्या लग्नाची तारीख निश्चित झाल्याची बातमी समोर येत आहे. दरम्यान परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा यांची एंगेजमेंट नवी दिल्लीतील कपूरथला हाऊसमध्ये १३ मे रोजी झाली होती. या साखरपुड्यात बॉलीवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रासह इतर काही प्रसिद्ध लोकही सहभागी झाले होते. एंगेजमेंटनंतर, परिणीतीचे चाहते तिच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत आहे.
लवकरच लग्नबंधनात अडकणार : मीडिया रिपोर्ट्सनुसार, हे जोडपे याच वर्षी २५ सप्टेंबरला लग्नबंधनात अडकणार आहेत. मात्र, लग्नाच्या तारखेबाबत कोणताही अधिकृत खुलासा करण्यात आलेला नाही. याशिवाय लग्नाच्या सुमारे १० दिवस आधी हे कपल सर्व तयारी सुरू करेल असे माहित झाले आहे. या लग्नात कुटुंबातील सदस्यांव्यतिरिक्त, खास मित्र आणि बॉलिवूड इंडस्ट्रीपासून तर राजकारणापर्यंतचे लोक उपस्थित राहू शकतात. दरम्यान, परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा हे राजस्थानमध्ये लग्न करू शकतात, अशा बातम्याही येत आहेत. कारण यापूर्वी हे जोडपे त्यांच्या भव्य लग्नासाठी ठिकाण शोधत होते. प्रियांकाप्रमाणेच परिणीतीही शाही पद्धतीने लग्न करणार आहे.