महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Priyanka Chopra birthday : परिणीतीने 'मिमि दीदी' उर्फ प्रियांका चोप्रावर वाढदिवसानिमित्य केला प्रेमाचा वर्षाव - प्रियांका चोप्रा आणि परिणीती

प्रियांका चोप्राला तिच्या वाढदिवसानिमित्य खास शुभेच्छा तिची चुलत बहिण परिणीती चोप्राने दिल्या आहेत. प्रियांकाच्या ४१ वा वाढदिवसानिमित्य तिने आपल्या मिमि दीदीवर सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेमाचा वर्षाव केला आहे.

Priyanka Chopra birthday
प्रियांका चोप्राला तिच्या वाढदिवसानिमित्य परिणीतीच्या शुभेच्छा

By

Published : Jul 18, 2023, 3:10 PM IST

मुंबई- ग्लोबल स्टार प्रियांका चोप्रा आज आपला ४१ वा वाढदिवस साजरा करत आहे. तिच्यावर जगभरातून विविध स्तरावरुन शुभेच्छा पाठवल्या जात आहेत. यात एक खास शुभेच्छा संदेश तिला तिची चुलत बहिण परिणीती चोप्राकडून मिळाला आहे.

प्रियांका चोप्राला तिच्या वाढदिवसानिमित्य परिणीतीच्या शुभेच्छा

परिणीतीने इन्स्टाग्राम स्टोरीवर प्रियांकासोबतचा फोटो शेअर करत लिहिलंय, हॅप्पीयस्ट बर्थ डे मिमि दीदी. तू जे काही केले आहेस, त्याबद्दल धन्यवाद.' तिने ही पोस्ट प्रियांकाच्या इन्स्टाग्राम स्टेरीवरही टॅग केली आहे. तिने शेअर केलेला फोटो परिणीतीच्या आम आदमी पक्षाचे नेते राघव चड्ढासोबतच्या साखरपुड्यातील आहे. यात प्रियांका निऑन कलरच्या ड्रेसमध्ये दिसत असून परिणीती आयव्हरी ड्रेसमध्ये दिसत आहे.

प्रियांका चोप्राने गेल्या काही वर्षात अनेक भूमिका साकारत ग्लोबल स्टार बनण्यापर्यंतचा प्रवास केला आहे. तिच्या वाढदिवसानिमित्य चाहत्यांनी सोशल मीडियावर प्रेम संदेशांचा वर्षाव केला आहे. तिचे फोटो शेअर करत त्यांनी देसी गर्लसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. 'प्रियांका चोप्रा तुला वाढदिवसाच्या सदिच्छा. तू आम्हाला अशीच प्रेरणा देत राहा आणि तुझ्या आरोग्यासाठी खूप शुभेच्छा', अशा आशयाचे भरपूर शुभेच्चा मेसेजेस तिला पाठवण्यात आले आहेत.

प्रियांका चोप्रा आणि परिणीती यांच्यातील नाते अतिशय घट्ट आहे. प्रियांकाच्या पावलावर पाऊल टाकत परिणीतीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. खूप कमी काळात आपल्या अभिनय सामर्थ्याची चुणूक तिने दाखवली आणि बॉलिवूडमध्ये स्वतःचे स्थान निर्माण केले. परिणीतीच्या साखरपुड्यासाठी प्रियांका खास अमेरिकेहून दिल्लीत दाखल झाली होती.

दरम्यान कामाच्या आघाडीवर प्रियांका चोप्रा अमेझॉन प्राइमच्या 'सिटाडेल' या मालिकेत झळकली होती. रुसो ब्रदर्सचा हा स्पाय थ्रिलर शो तिच्या चाहत्यांना भरपूर पसंतीस उतरला. प्रियांका आगामी चित्रपटात जॉन सीना आणि इद्रीस एल्बा यांच्यासोबत झळकणार आहे. परिणीती तोप्राचा विचार करता ती इम्तियाज अलीच्या 'चमकिला' चित्रपटात दिलजीत दोसन्जसोबत झळकणार आहे. यासोबतच ती टिनू सुरेश देसाई यांच्या 'द ग्रेट इंडिय रेस्क्यू' या चित्रपटात अक्षय कुमारसोबत काम करणार आहे.

हेही वाचा -

१.Dilon Ki Doria Song Release : 'बवाल' चित्रपटातील वरुण धवन आणि जान्हवी कपूरवर चित्रीत 'दिलों की डोरिया' गाणे रिलीज

२.Project K : 'प्रोजेक्ट के' चित्रपटामधील दीपिका पदुकोणचा फर्स्ट लूक समोर...

३.Omg 2's First Song Oonchi Oonchi Vaadi Out : 'ओएमजी २ चित्रपटामधील 'ऊॅंची ऊॅंची वादी' गाणे झाले प्रदर्शित...

ABOUT THE AUTHOR

...view details