मुंबई - मायानगरी मुंबईत सेलेब्रिटींचा वावर नित्याचा असतो. शुटिंगच्या कामानिमित्य किंवा सुट्टी निमित्य सेलेब्रिटी विमानतळावर नेहमी अवतरत असतात. साधारणपणे डेस्टीनेशन वेडिंग, सेलेब्रिटी वेडिंग रिसेप्शन्स, शुटिंग स्टुडिओ फ्लोअर्स, रिआलिटी शोजचे स्टुडिओ, सेलेब्रिटी जीम्स, पंचतारांकित हॉटेल्स, जुहू आणि मलबार हिल्समधील आलिशान घरे अशा ठिकाणी सेलेब्रिटी नेहमी नजरेस पडतात. असे सेलेब्रिटी दिसल्यास पूर्वी लोक त्यांची स्वाक्षरी घेण्यासाठी धावत असत. आता त्याऐवजी लोक सेल्फीचा आग्रह धरतात. मात्र कोणता सेलेब्रिटी कोठे अवतरणार आहे, याची खबर ठेवणारेही मुंबईत कमी नाहीत. अशा सेलेब्रिटींना आपल्या कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी धडपडणाऱ्या अशा हौशी फोटोग्राफर्सना पापाराझी या नावाने ओळखले जाते. तर आज या पापारझींच्या कॅमेऱ्याने काही सेलेब्रिटींना आपल्या कॅमेऱ्यात बंद केले आहे. त्यांचा व्हिडिओ पाहूयात.
दिशा पटानी, आर्यन खान, आदित्य रॉय कपूर, आयुष्मान खुराना आणि त्याची पत्नी ताहिरा कश्यप यासारखे बॉलिवूड सेलिब्रिटी मंगळवारी रात्री मुंबईत स्पॉट झाले. दिशाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत ज्यात ती लेस डिटेल्ससह डेनिम शॉर्ट आणि बॅकलेस लाल टॉप घातलेली दिसत आहे.
काल रात्री पॅप्सने तिला पाहिले तेव्हा दिशा एका रेस्टॉरंटमधून बाहेर पडताना दिसली. दरम्यान, शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानही याच रेस्टॉरंटमध्ये स्पॉट झाला होता. आर्यन खान काळा टी-शर्ट आणि डेनिमची जोडी घालून डिनरसाठी बाहेर पडला. बास्टियन रेस्टॉरंटमधून बाहेर पडतानाच्या फोटो आणि व्हिडिओमध्ये आर्यन मस्त दिसत होता. रेस्टॉरंटच्या बाहेर हँडसम हंक आदित्य रॉय कपूर देखील दिसला. शहरातून बाहेर पडताना आदित्यने स्वतःला कॅज्युअल ठेवले.